सॅबी परेरा

ओळखलंत का सर मला
(त्या दिवशी) पहाटे आलो होतो मी
कपडे होते कर्दमलेले
केसालाही लावली नव्हती फणी

त्या दिवशी..
क्षणभर बसलो, नंतर हसलो,
बोललो मामूवर पाहुन..
निवडणूक पाहुणी आली,
गेली कपाळात घालून
माहेरवाशीण पोरीसारखी,
चार भिंतीत नाचली..
काकांच्या पावसातल्या भाषणामुळे
इज्जत मात्र वाचली

नेते फिरले, राजे हरले, सरदार पडले,
होते नव्हते बीजेपीत गेले..
प्रसाद म्हणून पक्षामध्ये
आव्हाड भुजबळ ऊरले

आता..
ऊद्धवजींना घेऊन संगे,
सर आता लढतो आहे..
घुसमट थोडी साहतो आहे
पदाचा भार वाहतो आहे

खिशाकडे हात जाताच,
उठलेला परत खाली बसला..
टक्के नकोत सर,
इथे जरा ऊप-यागत वाटलं
बंड झाले थंड तरी
मोडला नाही माज
पन्नास तुमचे, पन्नास आमचे
चला, बोहनी करा आज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.