सांगली: भ्रमणध्वनीवर मुलाशी संवाद झाला आणि वाहकाने घंटा वाजवून बस थांबवली. खाली उतरुन दुकानातून पेढे घेतले. बसमध्ये असलेल्या प्रत्येक प्रवाशाला पेढे देऊन मुलाची केंद्रिय राखीव पोलीस दलामध्ये निवड झाल्याची आनंदवार्ता आताच समजल्याचे सांगितले.

शिराळा आगाराची बस (क्रमांक एमएच १४ बी टी ३४२३) ही मुंबईला निघाली होती. कोणत्याही मुलाला हे माझे वडील आहेत असा अभिमान वाटावा असा प्रसंग यावेळी प्रवासादरम्यान घडला.

The central government has not given new permission for onion export but the open export of onion from the country is closed
कांद्याची खुली निर्यात बंदच, केंद्राचे आकडे गेल्या वर्षभरातील
11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

आणखी वाचा-सांगली: झोपेत सर्पदंश होऊन शाळकरी मुलीचा मृत्यू

बसचे वाहक नंदकुमार ढेबे (रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांना त्यांचा मुलगा शुभम याचा फोन आला. त्याची सीआरपीएफमध्ये निवड झाली असल्याचं त्याने सांगितलं. वडील आपल्या कर्तव्यावर होते. त्यांनी एका दुकानाजवळ बसला बेल दिली. पटकन खाली गेले आणि पेढ्याचे दोन मोठे बॉक्स घेऊन आले. समजलेल्या सुवार्तेच्या आनंदामध्ये प्रवाशांनाही सहभागी करुन वाहक ढेबे यांनी आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला.