सांगली: गुरूवारी रात्रीची वेळ आणि पोलीसांना दूरध्वनीवरून कुपवाडमधील एका कारखाना परिसरात खून झाल्याची माहिती मिळाली. मात्र, रात्रभर शोधूनही घटनास्थळी काहीच आढळले नाही. ज्या भ्रमणध्वनीवरून माहिती मिळाली त्याचा शोध घेतला असता मद्याच्या अंमलाखाली त्यांने ही माहिती दिली असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी सुटकेचा निश्वास टाकत असतानाच मद्यपींचा योग्य तो पाहुणचार करीत औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.

नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी डायल ११२ हा नंबर देण्यात आला आहे. गुरूवारी रात्री या फोनवर कुपवाडमधील सुपर क्रॉप्ट कारखान्याजवळ एकाचा खून झाल्याची माहिती मिळताच ही माहिती मुख्यालयातून तात्काळ मिरज व औद्योगिक पोलीस ठाण्यात देण्यात आली. दोन्ही पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले. मात्र, या कारखाना परिसरात काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. ज्या भ्रमणध्वनीवरून हा संदेश आला होता, त्याच नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात आला होता. पोलीसांनी शोधाशोध केली असता एक तरूण दारूच्या नशेत पडल्याचे आढळले.

Gadchiroli, Wild Elephant Attack, Gadchiroli Wild Elephant Attack, women dies in Wild Elephant Attack, Wild Elephant Attack women dies, bhamaragad, Hidur Village, marathi news, Wild Elephant Attack, Gadchiroli news, Wild Elephant in Gadchiroli, bhamaragad news, Hidur Village news,
गडचिरोली : हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेचाही मृत्यू; आतापर्यंत तिघांचे बळी
Ten pigs are dying every day and citizens are suffering but there is no solution from the administration
अरेरे! हे काय, डुकरं पटापट मरताहेत आणि प्रशासन मात्र ढिम्म…
Voting machines, Thane, Jitendra Awhad,
ठाण्यात भंगार अवस्थेत सापडली मतदान यंत्रे, मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

आणखी वाचा-आमदार पाटील यांनी शिवीगाळ केलेल्या पत्रकारास मारहाण; पाचोऱ्यात अदखलपात्र गुन्हा

या मद्यपी तरूणाची चौकशी केली असता त्यांने हा संदेश आपणच दिल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याचा यथेच्छ पाहुणचार करून गुन्हाही दाखल केला. या तरूणाचे नाव सुदीप धुपेंद्रसिंह पटेल (वय ३६, रा. सुपर क्रॉप्ट, मूळ गाव गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे आहे.