जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी धमकी दिलेल्या पाचोरा येथील पत्रकाराला पालिकेसमोर बुधवारी सायंकाळी टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. संदीप महाजन असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी जिल्ह्यातील वातावरण तप्त असताना पाचोरा येथील स्थानिक पत्रकार महाजन यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करीत विश्लेषणात्मक बातमी केली होती. यात त्यांनी आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख केल्याचा आरोप करीत आमदार पाटील यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून शिवीगाळ करीत धमकावले होते. यासंदर्भातील ध्वनिफीत समाजमाध्यमातून बाहेर आल्यानंतर आमदार पाटील यांनी शिवीगाळ केल्याचे कबूल केले होते.

Kolhapur, Youth murder,
कोल्हापूर : इचलकरंजीत तरुणाचा खून; ८ जणांवर गुन्हा दाखल
shiv sena office bearer, Accusation bal hardas, bal hardas threatining shiv sena office bearer, kalyan, kalyan lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, kalyan news, uddhav Thackeray shiv sena, Eknath shinde shivsena,
कल्याणमध्ये बाळ हरदास यांची शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी, बाळ हरदास यांनी आरोप फेटाळले
devendra fadnavis challenges uddhav thackeray over vijay wadettiwars controversial remarks
वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
rohit pawar
“बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस”, रोहित पवारांनी शेअर केले VIDEO, रात्री १२ नंतर बँकही चालू?
Kirit Somaiya on Yamini Jadhav and Ravindra Vaikar
‘आता घोटाळेबाजांचा प्रचार करावा लागणार?’ किरीट सोमय्या म्हणाले, “ही तडजोड…”
Kirit somaiya corruption allegations on candidate contesting lok sabha poll,
सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पाच जण रिंगणात! एक भाजपकडून, तर मित्रपक्षांकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी
Three Killed in Car Accident, Lonikand Theur Road, Truck Driver Arrested, accident Lonikand Theur Road, Three Killed in Accident Lonikand Theur Road, accident news, car accident news, lonikand theur road accident,
नवीन मोटार घेतल्यानंतर दर्शन घेऊन निघालेल्या तिघांवर काळाचा घाला; लोणीकंद- थेऊर रस्त्यावर ट्रकची मोटारीला धडक
Despite Ajit Pawars request no action has been taken against doctor who threw alcohol party in Sassoon Hospital
अजितदादांनी सांगूनही कारवाई नाही! मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांना घातले पाठीशी

 आमदार पाटील यांच्याकडून आपल्यासह कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याने संरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आपणास काही झाल्यास त्याला जबाबदार आमदार पाटील व त्यांचे समर्थक असतील, असे महाजन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. परंतु, त्यांना संरक्षण देण्यात आले नाही. महाजन हे बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून घरी जात असताना पाचोरा पालिकेसमोरील भररत्यात त्यांना चार-पाच जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून खेचत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.