ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. अब्दुल सत्तार हा हिरवा साप आहे. त्याला पूर्णपणे गाढल्याशिवाय मी राहणार नाही, असा एकेरी उल्लेख करत खैरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी ओला दुष्काळ पाहण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला. याबाबत विचारलं असता चंद्रकांत खैरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दुल सत्तारांचा एकेरी उल्लेख करत चंद्रकांत खैरे म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत अब्दुल सत्तारांना गाढण्याचं काम मी करणार आहे. काहीही केलं तरी त्याला निवडून येऊ देणार नाही. त्याने अनेकांना लुबाडलं आहे. अनेक मुस्लिमांच्या जमिनीही त्याने हडपल्या आहेत. याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आली आहेत. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस कसं सहन करतात? असा माझा प्रश्न आहे. अब्दुल सत्तारांचा बेशिस्तपणा तुम्हाला आवडतो का? मंत्रिमंडळात सत्तारांसारखे मंत्री असल्याने तुमच्या सरकारचं नाव बदनाम होत आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांना ताबोडतोब काढून टाकलं पाहिजे, अशी मागणी मी फडणवीसांकडे करतो, असं खैरे म्हणाले.

MP Sanjay Raut
“केंद्रात दोन अतृप्त आत्मे”, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू…”
uncle hd kumarswami
प्रज्ज्वल रेवण्णाचे काका, जेडीएसच्या एचडी कुमारस्वामींना कॅबिनेट मंत्रीपद
Devendra Fadnavis offers to resign as Deputy CM
देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा
Chandrakant Khaire
“मी एकटा पडलो”, पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं विधान; म्हणाले, “काही लोकांवर संशय, उद्धव ठाकरेंकडे…”
Rohit Pawar, Ajit Pawar,
“केवळ दादाच असतील, इतर सगळे…”; अजित पवारांवर रोहित पवारांची मिश्किल टीका
Actor Prakash Raj Taunts Modi
“मोदी, तुम्ही शाळेत गेला असतात तर..”, महात्मा गांधींवरच्या वक्तव्यावरुन प्रकाश राज यांचा पंतप्रधानांना टोला
Attack on Indapur Tehsildar Srikant Patil
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला
What Ravindra Dhangekar Said?
“पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले, त्यामुळेच…”; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

फडणवीसांना उद्देशून खैरे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, तुम्हाला माहीत आहे की, अब्दुल सत्तार सुरुवातीला भाजपात आले होते. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन सत्तारांना विरोध केला. त्यामुळे तुम्ही सत्तारांना आमच्याकडे ढकललं. युती असल्याने उद्धव ठाकरेंनी सत्तारांना शिवसेनेत सामावून घेतलं आणि निवडूनही आणलं.

हेही वाचा- ‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार, जर…”

आता इतकं झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मला आठवण करून देतात की, तुम्ही सत्तारांना हिरवा साप म्हणायचे. आता मी सिल्लोडला जाऊन भाषण करणार आहे, त्यातही मी त्यांना हिरवा सापच म्हणणार आहे. माझे मुस्लीम भाऊही हे ऐकतील, तेही माझं समर्थन करतात. कारण अब्दुल सत्तारांनी मुस्लिमांच्या जमिनी हडपल्या आहेत. तो हिरवा साप अलीकडे भगवा झाला होता. पण आता तो सरडा झाला आहे, अशी बोचरी टीका अब्दुल सत्तारांनी केली आहे.