ऊसतोड वाहतुकीच्या कामासाठी रेणा सहकारी साखर कारखान्याकडून आगाऊ रकमेची उचल घेऊन फसविणाऱ्या बलगाडी ठेकेदारास सहा महिने तुरुंगवास व उचललेली सर्व रक्कम दंड म्हणून भरणा करण्याची शिक्षा रेणापूरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. चव्हाण यांनी ही माहिती दिली. वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथील बलगाडी ठेकेदार विष्णू मुंडे याने २००५-०६ च्या गळीत हंगामात रेणा कारखान्यासोबत बलगाडी यंत्रणेचा करार करून आगाऊ रक्कम उचलली. परंतु आपली बलगाडी यंत्रणा कामावर पाठवली नाही. शिवाय रकमेची परतफेड करण्यासाठी कारखान्यास रक्कम नसलेल्या बँकेच्या खात्याचा धनादेश दिला. कारखान्याची रक्कम बुडवण्याच्या हेतूने खोटा धनादेश देऊन फसवण्याचा प्रयत्न करून तो पसार झाला. त्यामुळे मुंडे याच्या विरोधात रेणापूर न्यायालयात रक्कम वसुली फसवल्याबाबत दावा दाखल करण्यात आला होता. रेणपूरच्या प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहानिशा करून आरोपी मुंडे यास ६ महिने तुरुंगवास व कारखान्याकडून उचलेली आगाऊ रक्कम १ लाख ३७ हजार ३५ रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. आरोपी मुंडे याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. कारखान्याच्या वतीने कायदेशीर सल्लागार शिवकुमार जाधव व अॅड. श्रीकांत टाकळीकर यांनी बाजू मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating contractor jail
First published on: 22-05-2014 at 01:51 IST