नगरमधील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरामध्ये रसायनाच्या टॅंकरचा स्फोट झाल्याने कॉंग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षांचा मृत्यू झाला. रामभाऊ टिक्कल असे त्यांचे नाव आहे.
रामभाऊ टिक्कल यांच्याच मालकीचा संबंधित टॅंकर होता. बुधवारी सकाळी टॅंकरची साफसफाई सुरू असताना अचानक त्याचा स्फोट झाला. त्यामध्ये टिक्कल यांचा मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता मोठी होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.