गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याचं वृत्त समोर आलं असून त्यामुळे राज्यभर मराठा आरक्षणाची चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात ओबीसी आरक्षण रक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणारे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक मुद्दे मांडले आहेत. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करतानाच कुणबी नावाने मागच्या दाराने मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवण्याच्या प्रयत्नाचा आक्रमकपणे विरोध करणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

“पुन्हा उपोषण करण्याचं कारण काय?”

“ही लोकांच्या घरासमोर रात्री ३ – ३ वाजेपर्यंत वेडंवाकडं बोलून त्रास दिला गेला. हे झाल्यानंतर पुन्हा उपोषण करण्याचं कारण काय? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयरेच्या नावाखाली त्याची नको ती व्याप्ती वाढवू नका”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

“मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा पाठिंबा आहेच”

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्य असताना, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे समितीच्या शिफारशीनुसार एक कायदा केला. तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशनच्या शिफारशीनुसार आरक्षण देण्यात आलं. पण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं. त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला. त्यावर वाद वगैरे झाला हे वेगळं. त्या आयोगानं १५-२० दिवसांत अडीच कोटी घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असं मी ऐकलंय. क्युरेटिव्ह पिटीशनसाठी तीन न्यायमूर्तीही बसले आहेत. मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल, यासाठी हे सगळे बसले आहेत. आमचा पाठिंबा त्याला आहेच”, असंही भुजबळ म्हणाले.

“जरांगेंना वाटलं श्रेय मिळवता येईल”

“जरांगेंना वाटलं असेल की १५ तारखेला येणारच आहे, मराठा आरक्षण मिळणारच आहे. मग आपण १० तारखेलाच उपोषणाला बसावं.जेणेकरून त्याचं श्रेयही मिळवता येईल. त्यांची धारणा चुकीची नाही. पण त्यांचं काम पूर्ण झालं नाही. ते आणखी ५-६ दिवस पुढे गेलंय”, अशा शब्दांत छगन भुजबळांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

“सरकार जाऊदे खड्ड्यात, तुम्ही आधी उपचार घ्या”, आंदोलकांचा जरांगेंपुढे टाहो; पाटील म्हणाले, “आपण आता…”

“आता ते शिव्याच द्यायला लागले आहेत. तेही आईवरून शिव्या देत आहेत. गल्लीवरचे लोक शिव्या देतात तशा शिव्या देत आहेत. तिथे असणाऱ्या एसपी, जिल्हाधिकाऱ्यांना ते तुम्ही सगळे भा*** आहात असं म्हटल्याचं चॅनल्सवर दिसलं. त्यांनी असा त्रागा न करता शांत बसावं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पारित करतो आहोत. शिव्या देऊन किंवा आणखी भानगडी करून काय फायदा आहे? सगेसोयरेच्या माध्यमातून जे तुम्ही कुणबी म्हणत घुसवले आहेत, त्याविरोधात आमचा लढा चालूच असणार आहे”, असंही भुजबळ म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय की मराठा समाज मागास नाही. त्यामुळे त्यांना हवं तसं आरक्षण मिळणं शक्यच नाही. ते कुणबी प्रमाणपत्राच्या मदतीनं ओबीसींमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ३७४ जातींमध्ये ७ कोटी लोक आहेत. या मंडळींमध्ये त्यांनी बसू नये. त्यांनी त्यांचं वेगळं आरक्षण घ्यावं”, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली.