कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी बनविले आहे. पानसरे दाम्पत्यावर हल्ला कोणत्या कारणातून झाला असावा याच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात असून त्यामध्ये खासगी बाबींचाही समावेश आहे का, ही शक्यताही आजमावली जात असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, गोिवद पानसरे व उमा पानसरे या उभयतांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे गुरुवारी सायंकाळी वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पानसरे दाम्पत्यावरील हल्ल्याचा तपास पोलिसांसह मुंबई क्राईम ब्रँच करीत आहे. घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांना ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. तपासाबाबत पोलीस सूत्रांकडून गुरुवारी काही माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
कॉम्रेड पानसरे यांच्या हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी बनविले आहे.

First published on: 20-02-2015 at 05:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comrade govind pansare attackers sketches ready