पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी हे हिंदुत्ववादीच होते तसेच सोमनाथ मंदिरात दर्शन घेणारे व जानवं दाखवणारे राहूल गांधी हिंदुत्ववादीच असल्याचे उद्गार शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काढले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे – संजय राऊत

काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर तुमचं हिंदुत्व कुठे असं विचारल्यावर काँग्रेस ही देखील हिंदुत्ववादीच असल्याचं राऊत म्हणाले. लोकमान्य टिळक तसेच महात्मा गांधी हे ही कडवट हिंदुत्ववादी होते असं सांगताना राऊत यांनी काँग्रेस ही देखील हिंदुत्ववादी असल्याचे राऊत म्हणाले. राजकारण व धर्म वेगळा आहे असं सांगत राजकारणामध्ये धर्म आणू नये असे त्यांनी सांगितले.

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत – संजय राऊत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही हिंदुत्ववादीच असल्याचं राऊत म्हणाले. तसंच आम्ही समान विकास कार्यक्रमावर महाविकास आघाडीचं सरकार चालवत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. भाजपावर टिका करताना राऊत म्हणाले की भाजपामध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.