scorecardresearch

Premium

“मी अण्णा हजारेंची हत्या करणार!”, शेतकऱ्याची शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, “१ मे…”

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Anna Hazare
अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी. (PC : Indian Express)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची प्रकरण समोर आलं आहे. शेतीच्या वादातून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने १ मे रोजी आपण अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं जाहीर केलं आहे. शेतीच्या वादामध्ये अण्णा हजार यांनी मध्यस्थी करून आपल्याला न्याय द्यावा यासाठी गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिलं होतं. गायधने यांनी अण्णा हजारे यांच्याकडे मदतीची मागणी केली होती, परंतु अण्णांनी माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही असा आरोप करत, गायधने यांनी राळेगणसिद्ध येथे जाऊन अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं सांगितलं आहे.

संतोष गायधने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, शेतीच्या वादात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळेच आम्ही अण्णांकडे गेलो. पण अण्णासुद्धा मॅनेज झाले. त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. आम्हाला न्याय देणं शक्य नसेल तर आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी याचिका मी दाखल केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil and Chhagan Bhujbal
भुजबळांना सल्ला देण्याची गरज नाही, राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले…?
Chandrasekhar Bawankule
हिंदू धर्म संपवण्याची स्टॅलिन यांची भाषा पवार , ठाकरे , पटोले यांना मान्य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
eknath shinde and sanjay raut
“संजय राऊतांसारख्या ढेकणाला मारण्यासाठी…”, शिंदे गटाच्या आमदाराची बोचरी टीका
Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

हे ही वाचा >> “अजित पवारांकडून माझ्या जिवाला धोका”, पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

गायधने म्हणाले की, मला न्याय मिळाला नाही तर मी १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन आत्मदहन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मी पत्रात तसं लिहिलं आहे असं म्हटलं जातंय, परंतु मी तसं करणार नाही. मी आत्मदहन करणार नाही, कारण मी भित्रा नाही. मी अण्णा हजारे यांची हत्या करणार आहे. १ मे रोजी मी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची हत्या करेन.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death threat to social worker anna hazare by santosh gaydhane asc

First published on: 12-04-2023 at 15:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×