भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वपक्षाचं कौतुक करतानाच विरोधी पक्षांवर टीका केली. तसेच, इतर पक्ष फुटण्यामागे स्वार्थी, आत्मकेंद्री नेते असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. एकीकडे फुटलेल्या पक्षांमधील गट किंवा नेते मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये आलेले असताना दुसरीकडे फडणवीसांनी इतर पक्षांमधील फुटीबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

भाजपाच्या स्थापनादिनी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी फडणवीसांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला. “भाजपा आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जगात सर्वाधिक सदस्य भाजपाचे आहेत. भारतात सर्वाधिक खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य, महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य भाजपाचे आहेत”, असं ते म्हणाले.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

भाजपात कधीच फूट पडली नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. “देशाच्या इतिहासात एकच असा राष्ट्रीय पक्ष आहे ज्यात कधीच उभी फूट पडली नाही. देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या आता मोजता येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. समाजवादी पक्षाची तर एवढी शकलं पडली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल. पण भाजपा एकमेव असा पक्ष आहे की पहिल्यापासून आजपर्यंत या पक्षात कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भारतीय जनता पक्षात कधीच फूट का पडली नाही?

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात फूट न पडण्यामागचं कारण सांगितलं. “भारतीय जनता पक्षात फूट पडली नाही याचं एकमेव कारण म्हणजे या पक्षाचे नेते कधी आत्मकेंद्री नव्हते. ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कुणालातरी पंतप्रधान बनवण्यासाठी, कुणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी, कुणालातरी सत्तेची खुर्ची देण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही. एका विचारासाठी हा पक्ष तयार करण्यात आला”, असं ते म्हणाले.

कल्याणमधून श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार, देवेंद्र फडणवीसांनी केलं शिक्कामोर्तब; म्हणाले, “भाजपाकडून…”

जयंत पाटलांना टोला

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानावरून टोला लगावला. “बारामतीमध्ये काही गोष्टींचा ठरवून प्रचार केला जातोय”, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “ते त्यांच्या पक्षात नाराज आहेत. त्यांच्या पक्षात त्यांना कुणी विचारत नाहीत. त्यामुळेच ते अलिकडच्या काळात अशी वक्तव्य करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारच दिसतायत. एवढी मोठी निवडणूक चालू आहे, पण जयंत पाटील कुठेही दिसत नाहीयेत”.