पंढरपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठलाचा प्रसाद आणि अन्य वस्तू आता भाविकांना घरपोच मिळणार आहेत. श्री विठ्ठल-रूक्मिणी सेवा समितीने तयार केलेल्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

‘पंढरी प्रसाद डॉट कॉम’ नावाने सुरू केलेल्या या संकेतस्थळाचा आरंभ मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि ज्योतिषाचार्य ह. भ. प. अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते झाला.

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
washim lok sabha seat, Govinda s Roadshow in Washim, Receives low Response, mahayuti, canidate rajshri patil, election campaign, govinda Disappointed Fans,
गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी…..
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
attack on college girl failed after the woman started screaming
शाब्बास! महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…

करोनाचे संकट आणि टाळेबंदी असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही यात्रेसाठी भाविक पंढरपूरला येऊ शकला नाही. आणखी ही स्थिती किती दिवस राहील याबद्दलही साशंकता आहे. त्यामुळे पांडुरंगाचा प्रसाद प्रत्येकाला घरपोच मिळावा यासाठी सेवा समितीने ही योजना सुरू केली आहे.

www.pandhariprasad.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता भाविक ‘ऑनलाइन’ शुल्क भरून कुरियरद्वारे पंढरीच्या प्रसादासह अन्य प्रासादिक वस्तू घरपोच मागवू शकतात.

पंढरीला येणारा भाविक हा येथील प्रसादासह बुक्का आपल्यासोबत नेत त्याचे वाटप करतो. या दोन गोष्टींच्या आधारे विठ्ठलाचे दर्शन घडत असल्याची भावना अनेक भाविकांमध्ये आहे. मात्र गेले आठ महिने  विठ्ठलाचे दर्शन बंद होते. आता मंदिर उघडले असले तरी त्यासाठी रोज ठरावीक भाविकांनाच प्रवेश दिला जात आहे.

या सेवेद्वारे पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये लाडू, पेढय़ाच्या प्रसादासह कुंकू, बुक्का, तुळशीच्या माळा,  अगरबत्ती, चंदनी खोड-सहाण, टाळ, श्री विठ्ठलाच्या सर्व प्रकारची मूर्ती, फोटोफ्रेम, सोवळे, उपरणे आदींचा समावेश आहे. पंढरपुरातील प्रासादिक वस्तूंच्या सर्व प्रमुख उद्योजकांनी एकत्र येत या उपक्रमात आपला सहभाग दिला आहे.

यातून या व्यावसायिकांना आधार तर पंढरपूर बाहेरील भाविकांना घरपोच प्रसाद मिळेल असे अनिरुद्ध बडवे यांनी सांगितले.

यावेळी शैलेश खरात, विनायक हरिदास,अजय जव्हेरी आदी उपस्थित होते.