जिथे पवार आडनाव दिसेल, तिथे मतदान करा, म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही, असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीतील जनतेला केले होते. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी एक मूळचे पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार, असे म्हणत सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचे सुचविले होते. शरद पवारांच्या या विधानावरून आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

शनिवारी बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “एक निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार सुनेला परकं म्हणाले. आज त्यांच्या घरातही मुली आहेत. त्या मुली उद्या सून म्हणून कोणाच्यातरी घरी जातील. कुणाचीतरी लेकी उद्या सून म्हणून त्यांच्या घरता येईल. मात्र, फक्त एक निवडणूक जिंकण्यासाठी कोणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये”, असे ते म्हणाले.

Bajrang Sonwane On Amol Mitkari
“अमोल मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?”, बजरंग सोनवणेंचा टोला; म्हणाले, “…तर जनता चपलेने मारेल”
Sunil Tatkare On Amol Mitkari on Bajrang Sonwane
मिटकरींनी बजरंग सोनवणेंबाबत केलेल्या विधानानंतर तटकरेंचंही सूचक विधान; म्हणाले, “अजित पवार आणि माझ्या संपर्कात…”
nitish kumar
“मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ”; नितीश कुमारांचाही चर्चांना पूर्णविराम!
Rohit pawar
“अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात”, लोकसभेच्या निकालानंतर रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “मारून मुटकून…”
sugarcane, Raju Shetty,
मागील हंगामातील उसाचे प्रतिटन १०० रुपये द्या – राजू शेट्टी यांची मागणी; आचारसंहितेनंतर बैठकीचे आयोजन – पालकमंत्री मुश्रीफ
deepak chhagan jitendra
‘मनुस्मृतीच्या चंचूप्रवेशा’वरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण, तर दीपक केसरकारांवर टीका; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
Rohit pawar on Tanaji Sawant
“भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता नांग्या…”, अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका
Opposition criticizes Ajit Pawar for not reacting on Kalyaninagar accident case
पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चर्चा, कल्याणीनगर दुर्घटनाप्रकरणी भूमिका न घेतल्याची अजित पवारांवर विरोधकांची टीका

हेही वाचा – “साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या”, अजित पवारांच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…

सुप्रिया सुळेंनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांनाही लक्ष्य केलं. “मागच्या १५ वर्षात तीन वेळा खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जगप्रसिद्ध संसदरत्न यांनी आपल्या कल्पनेतून एकतरी प्रकल्प बारामतीत आणला का?” अशी खोचक टीका त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना बारामतीकरांनी लेकाला, बापाला, लेकीला निवडून दिले. आता सुनेला निवडून द्या, पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले होते. यासंदर्भात बोलताना, अजित पवार हे काहीही चुकीचे बोलले नाहीत. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, हा फरक ओळखा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती.