सिंधुदुर्ग, गोवा व रत्नागिरी जिल्ह्य़ांतील गिरणी कामगारांचा भव्य महामेळावा रविवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. वैश्य समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.  यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, आंबेकर इन्स्टिटय़ूट संचालक जी. बी. गावडे, सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष दिनकर मसगे उपस्थित राहणार आहेत.
गिरणी कामगारांच्या वारसांना नोकरी द्या, पी.एफ., पेन्शन सर्व कामगारांना चालू करा, लॉटरीमध्ये घर लागलेल्या कामगारांना तातडीने घराचा ताबा द्या, म्हाडाच्या जमिनी मिळाल्या तेथे घरबांधणी काम हाती घ्या, बी.पी.एल.ची कार्डे उत्पन्नाची अट २१ हजापर्यंत करा, अशा विविध मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार आहेत.
या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी दिनकर मसगे, शामसुंदर कुंभार, सौ. जयश्री सावंत, रामचंद्र कोठावळे, राजेंद्र पडते, रामचंद्र मोरजकर, शरद परब, आपा नागरे, लॉरेन्स डिसोजा, रमेश कानडे, प्रभाकर काराणे, वामन साईल, सुभाष परब, नामदेव घाडीगावकर तसेच अन्य कामगारांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली.