Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
Mumbai, nursery,
मुंबई : उच्च न्यायालयातील पाळणाघराला अखेर न्याय

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि खुन खटल्याची सुनावणी पुर्ण झाली आहे. सुंपुर्ण महाराष्ट्र भरातील गणेश भक्तांचे लक्ष लागुन राहिलेल्या या प्रकरणाचा निकाल येत्या १३ ऑक्टोंबरला अपेक्षित आहे.

२४ मार्च २०१२ला ही घटना घडली होती. यात महादेव गोपाळ घडशी आणि अनंतर बापू भगत या दोघांचा मृत्यू झाला होता. तर सुवर्ण गणेशाची प्राचिन मुर्ती दरोडेखोरांनी जवळपास दिड किलो सोन्याची गणेश मुर्ती दरोडेखोरांनी लुटून नेली होती.  या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशन मध्ये १२ जणांविरुध्द भादवी कलम  ३९६.३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरु होती.  या प्रकरणी तपासी अधिकारी संजय शुक्ला आणि वि वी गायकवाड यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयासमोर दाखल केले होते. तेव्हा पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. विशेष मोक्का न्यायाधिश के आर पेठकर यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत एकुण १०४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात मंदिर व्यवस्थापन समिती, तपासी अधिकारी, पंच साक्षीदार, वाहन चालक, वैद्यकीय अधिकारी, सिसीटिव्ही तंत्रज्ञ यांच्या आणि स्थानिकांच्या साक्षी महत्वाच्या ठरणार आहेत.

मंदीरातील सिसीटिव्ही कॅमेरयात कैद झालेल्या आरोपींचे शुटींग, त्यांनी वापरलेल्या मोबाईल सिमकार्डचे टॉवर लोकशन यामुळे गुन्ह्याच्या घटनांची मांडणी करण्यात पोलीसांना यश आलेआहे. याशिवाय दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या पहारी, चोरीला गेलेली दानपेटी, आरोपींकडून १ किलो २४६ ग्रॅम सोन्याची लगडी हस्तगत करण्यात पोलीसांना आलेले यश महत्वपुर्ण ठरले. या प्रकरणात शासकीय अभिव्योक्ता म्हणून अँड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फ ९ वकीलांनी आपली बाजू मांडली.

या प्रकरणाची सुनावणी आता पुर्ण झाली असून १३ ऑक्टोबरला निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे संपुर्ण राज्याचे लक्ष्य लागलेल्या या प्रकरणाचा निकाल काय लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोपींची नावे,

१.नवनाथ विक्रम भोसले- घोसपुरी अहमदनगर</p>

२.कैलास विक्रम भोसले- घोसपुरी अहमदनगर

३.छोट्या उर्फ सतीश जैनु काळे- बिलोणी औरंगाबाद</p>

४.आनंद अनिल रायमोकर- बेलंवडी श्रीगोंदा(सोनार)

५.अजित अरुण डहाळे-धारगाव श्रीगोंदा(सोनाराचा सहकारी)

६.विजय उर्फ विज्या बिज्या काळे कोळगाव,अहमदनगरज्

७.ज्ञानेश्वर विक्रम भोसले, मोळवाडी घोसपुरी

८.गणेश विक्रम भोसले- मोळवाडी घोसपुरी

९.खैराबाई विक्रम भोसले, मोळवाडी

१०.विक्रम हरिभाऊ भोसले, मोळवाडी

११.कविता उर्फ कणी राजू काळे, हिरडगाव श्रीगोंदा

१२.सुलभा शांताराम पवार, लोणी