आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आंदोलन होत आहेत. कर्नाटकसह सर्व निवडणुकांचे निकाल पाहा. नागरिक भारतीय जनता पक्षालाच पाठिंबा देत आहेत असा टोला विरोधी पक्षाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवड मध्ये आयोजित दिव्यांग साहित्य वाटप आणि मुद्रा बँक योजना मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी देशाचे केंद्रीय अर्थराज्य मंत्री शिवप्रसाद शुक्ला, पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अमर साबळे,शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप,आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे,सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक आंदोलन होतायेत, परंतु कर्नाटकसह सर्व निकाल पाहा. आजही भारतीय जनता पक्षालाच कौल आहे असा टोला विरोधी पक्षाला बापट यांनी लगावला. पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील ७६ हजार नागरिकांना मुद्रा योजनेचा फायदा झाला आहे. त्याची रक्कम ८४० कोटी रुपयांच्या घरात आहे. ज्याला घर दार, संपत्ती नाही अशा तरुणांना व्यवसायात काही तरी करून दाखवायचे आहे.

अशांना ही योजना उपयोगी आहे असे बापट म्हणाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो, श्रीमंत महानगर पालिका म्हणून पिंपरी-चिंचवडचे नावलौकिक आहे. पण श्रीमंत केवळ पैश्यांनी होता येत नाही. त्याला मनाची श्रीमंती असावी लागते,ते पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांनी दाखवून दिलं आहे. पैशांनी नाही तर मनाने श्रीमंत पालिका आहे त्याचा मला आनंद असल्याचे गिरीश बापट यांनी म्हटले आहे.