डॉ . राणी बंग यांचा ‘तारुण्यभान’ हा लैंगिकता विषयक कार्यक्रम आता युट्यूबवर!

डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेने १९९५ साली ‘तारुण्यभान’ हा उपक्रम सुरु केला आहे

“तारुण्यभान:- तरुण-तरुणींसाठी ‘प्रेम, लैंगिकता व प्रजननविषयक’ शास्त्रीय ज्ञान आणि सामाजिक भान” हा कार्यक्रम डॉ. राणी बंग यांच्यासोबत दर बुधवारी ‘निर्माण फॉर यूथ’ या यु-ट्यूब चॅनलवर असणार आहे.

लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली ‘तारुण्यभान’ हा उपक्रम सुरु केला.

गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे. उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच २५ वर्षे सातत्यपूर्ण संशोधन करत ‘तारुण्यभान’चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे. या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित ‘तारुण्यभान’ हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dr rani banga tarunyabhan program now is on youtube msr

ताज्या बातम्या