बदलते पर्यावरण व असह्य़ तापमानाच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पध्दतीत बदल करण्याची गरज ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांनी व्यक्त करून पर्यावरणस्नेही शेतीव्यवस्थेचा नवा पर्याय पुढे ठेवला आहे.
भारताच्या दुसऱ्या कृषीक्रांतीचे जनक, अशी ओळख असणाऱ्या डॉ.स्वामीनाथन यांनी बदलत्या पर्यावरणास डोळ्यापुढे ठेवून विवंचनेत सापडलेल्या भारतीय शेतकऱ्यांना हा नवा पर्याय देतांना आशादायी चित्र मांडले आहे. मान्सूनच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर डॉ.स्वामीनाथन यांनी २५ मे रोजी टिवट्रवरूनच याविषयी भाष्य केले आहे.
पावसाचे उशिरा किंवा अवेळी आगमन खरीपाच्या पहिल्या पेरणीवर घातक परिणाम करणारे ठरते. अल् निनो व अन्य घटकांमुळे शेतीपूरक वातावरणात घट होत आहे. या पाश्र्वभूमीवर पर्यावरणस्नेही शेती पध्दती स्वीकारणे अपरिहार्य ठरल्याचे डॉ.स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे, या नव्या पध्दतीत पोषणमूल्यांचे संवर्धन करणारी पीकरचना स्वीकारावी. पोषणमूल्ययुक्त शेतीव्यवस्थेत जैवविविधतेने युक्त पिकांचा प्रादेशिक गरजांनुसार अंतर्भाव व्हावा. जस्त, लोह, व्हिटॅमिन व आयोडिनचा अभाव दूर होईल, याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पारंपरिक छोटेखानी शेतीक्षेत्र हे पोषणयुक्त शिवारशेती व्हावी, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खरिपाच्या मुख्य शेतीक्षेत्रास असे नवे स्वरूप देणे, हाच अडचणीवरचा उपाय ठरणार आहे.
डॉ.स्वामीनाथन यांची पोषणमूल्याच्या शेतीचा हा नवा पर्याय शेतकऱ्यांपुढे ठेवतांना वाढत्या व असंबध्द तापमानाची बाब प्रामुख्याने विचारात घेतली आहे. उष्णतेची लहर मातीच्या वरच्या थरातील ओलावा दूर करू शकेल. कदाचित, त्यामुळे पेरणीसाठी थोडा अवधीही द्यावा लागेल, असे अनुमान त्यांनी बांधले आहे.  विशेष म्हणजे, शेतीक्षेत्रासाठी त्यांनी गृहविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे सुचविले आहे. मान्सून अनुकुल शेतीपध्दतीत बदल करतांना गरज असणाऱ्या पोषणमूल्यांबाबत हे विद्यार्थी सल्ला देऊ शकतात, तसेच दूरस्थ कृषी विभागातर्फे  पर्यावरण घटक व पिकांची निवड, याविषयी मार्गदर्शन घेतले जाऊ शकते, अशी सूचनाही आगामी खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर या दृष्टीने या कृषीशास्त्रज्ञाने केली आहे.

Ghatkopar hoarding collapse marathi news
फलक लावण्यात येणाऱ्या जागेच्या स्थैर्याचा मुद्दा दुर्लक्षितच, घाटकोपरच्या घटनेनंतर मुद्दा उपस्थित
Maternity leave
पहिल्या दोन लग्नांपासून महिलेला दोन मुलं, तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती रजा मिळेल का? उच्च न्यायालयानं केली महत्त्वपूर्ण टिप्पणी!
Aarti Aale and Tejas Garge
दीड लाखांच्या लाच प्रकरणात पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात, फरार तेजस गर्गेंचा शोध सुरु
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Loksatta editorial Spices Board bans some Indian brand products from Singapore and Hong Kong
अग्रलेख: अनिवासींच्या मुळावर निवासी!
Why was Harvey Weinstein conviction overturned in the MeToo case
#MeToo प्रकरणातील अत्याचारी हार्वे वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली? चळवळीला धक्का बसणार?
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा