ड्रग माफिया ललित पाटील याला जेव्हा अटक झाली त्याआधी आणि त्यानंतर आमच्या सरकारवर विविध आरोप झाले. मात्र त्याला पहिल्यांदा जेव्हा अटक झाली तेव्हा तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकचा पदाधिकारी होता. त्यावेळी त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पुढे काय झालं? असा प्रश्न आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ड्रग्जचा विळखा राज्याला बसू नये यासाठी हे सरकार गांभीर्याने काम करतं आहे असंही फडणवीस म्हणाले. तसंच उचलली जीभ आणि लावली टाळूला असा काहींचा स्वभाव असतो असाही टोला त्यांनी टीकाकारांना लगावला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

“ललित पाटील प्रकरणात ज्या मंत्र्यांची नावं घेतली गेली त्यांच्या विरोधात काय पुरावा आहे? एक तरी पुरावा मला दाखवा. तो ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकचा प्रमुख होता. त्यामुळे २०२१ मध्ये १४ दिवसांची पोलीस कोठडी होती आणि तो १४ दिवस रुग्णालयात होता. अशी ही पहिली केस असेल की इतका मोठा माफिया पकडला त्याची चौकशीच झाली नाही. एकही दिवस चौकशी झाली नाही. उद्या केस उभी केल्यावर तुम्ही न्यायालयाला काय सांगणार? जर तुम्ही न्यायालयाला सांगितलं असतं की ललित पाटील १४ दिवस रुग्णालयात होता तर न्यायालय तुम्हाला अतिरिक्त कोठडीची संमती देते. चौकशीसाठी संमती देते ती यांनी (उद्धव ठाकरे) का मागितली नाही? “

What Devendra Fadnavis Said About Sharad Pawar?
“शरद पवार हे अजित पवारांना व्हिलन बनवत होते, डावलत होते कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा
Sanjay Raut On Devendra Fadnavis
संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाले, “राजकारणातलं कच्चं मडकं…”
What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीसांचा टोला, “उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना डॉक्टर..”
Ajit pawar on chandrakant patil statement about sharad pawar
‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray,
“खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची; उद्धव ठाकरेंना राहुल गांधी समोर मुजरा…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका
Former Chief Minister Uddhav Thackeray
“आजच्या सरकारला डोकं नाही, फक्त…”; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल
Udayanraje Bhosale Full Speech
उदयनराजे भोसले यांची शशिकांत शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले, “कपाटं आणि खिशाला…”
Uddhav Thackeray And Modi
देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची फोनवरुन चौकशी करायचे, कारण..”

“आत्ता जो रुग्णालयात होता तो तुरुंग प्रशासनाच्या अंडर होता. ही सुरुवात त्यांच्या काळापासून म्हणजे महाविकास आघाडीच्या पासून झाली आहे. आता हे लक्षात आलं आहे, यातले धागेदोरे सापडले आहेत. आम्ही एकालाही सोडणार नाही. या प्रकरणात जे पोलीस थेट गुंतले असतील त्यांना कलम ३११ खाली डिसमिस करणार. काही लोकांनी निश्चित त्याला मदत केली आहे. मी काही त्यांच्या (उद्धव ठाकरेंच्या) प्रवक्त्यांसारखं हवेत बोलणार नाही. प्रत्यक्ष पुरावे हाती आले की मी सगळं सांगेन” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही९ मराठीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं आहे.