लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतुक सेवा २६ मे पासून बंद होणार आहे. पावासाळ्याच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मेरीटाईम बोर्डाने जारी केले आहे. दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणारी रो रो जलवाहतुक सेवा नियमितपणे सुरु राहणार आहे.

shambhuraj desai
ओबीसी, मराठा नेत्यांनी संयमाने बोलावे; प्रश्न सुटण्याच्या मार्गावर – शंभूराज देसाई
sant Dnyaneshwar maharaj palkhi marathi news
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात ६४ वैद्यकीय अधिकारी, ५३६ कर्मचारी
asaduddin owaisi s jai palestine
असदुद्दीन औवैसींच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसेना शिंदे गटाचा संताप, खासदारकी रद्द करण्याची मागणी
python
Video: सांगलीतील वारणावतीमध्ये अजगराचे दर्शन
onion, Devendra Fadnavis,
देवेंद्र फडणवीस यांचा इशारा, “ड्रग्ज प्रकरणाचं विरोधकांनी राजकारण करु नये, अन्यथा..”
sangli marathi news
सांगली: बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा, ७ जणांना अटक
Ajit Pawar VS Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाडांना अजित पवार गटाचं आव्हान; मुंब्रा-कळवा विधानसभेबाबत नजीब मुल्ला यांचं मोठं विधान
sangli district bank marathi news
सांगली: जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या मागणीसाठी आसूड मोर्चा
sangli corruption marathi news
सांगली: दुष्काळ मदत निधीचा अपहार करणाऱ्या १३ जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया ते मांडवा दरम्यान जल प्रवासी वाहतुक केली जाते. पिएनपी, मालदार आणि अजंठा अशा तीन खाजगी ऑपरेटर्स मार्फत जल वाहतूक सेवा पुरवली जाते. दरवर्षी या मार्गावरून साधारणपणे १२ लाख प्रवासी मार्गावरून ये जा करत असतात. कोकणातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेला हा जलमार्ग म्हणून ओळखला जातो. या शिवाय या मार्गावरून खाजगी स्पीड बोटींची मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते.

आणखी वाचा-कोकण, विदर्भात वादळी पाऊस; खेडमध्ये वृक्षांची पडझड; नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी

पावसाळ्यात प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही जल वाहतूक बंद ठेवण्यात येते. या काळात समुद्र खळवळलेला असल्याने बोटींना धोका उद्भवू शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून तीन महिने ही बोट सेवा बंद ठेवण्यात येत असते. यंदा २६ मे पासून या मार्गावरील सर्व बोटसेवा बंद करण्याचे निर्देश मेरीटाईम बोर्डाने दिले आहेत. त्यानुसार गेट वे ऑफ इंडीया ते मांडवा दरम्यान चालणारी बोट सेवा बंद करण्यात येणार आहे.