राज्यात शिंदे गट-भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊन तीन आठवडे उलटले आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिंदे आणि फडणवीस हजेरी लावणार आहेत. या द्वयींच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट आखला होता? तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
chhatrapati sambhajinagar, central minister bhagwat karad
दीड वर्षे मेहनत करुन राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पदरी निराशा

देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप तसेच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरविली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदे-फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>  “गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” सुहास कांदेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

शिंदे गटातील १६ बंडखोर आमदाराच्या अपात्रतेसह सरकारची स्थापना, विधानसभा अध्यक्षांची नेमणूक तसेच इतर प्रकरणांवरील दाखल याचिकांवर पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी होणार आहे. याच कारणामुळे अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा असे शिंदे-भाजपाचे मत आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटाला १३ ते १४ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.