राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील आमदारांनी पैसे खेऊन बंडखोरी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यासाठी ‘खोके’ हा विशेष शब्द वापरला जात आहे. असे असतानाच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात २५०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसान दावा ठोकणार असल्याचे शिवतारे म्हणाले होते. तशी घोषणा त्यांनी काल (८ नोव्हेंबर) केली होती. दरम्यान आज त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले आहेत. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय. चुकीचा प्रचार करण्यासाठी गोबेल्स नीतीचा उपयोग केला जात आहे, असा आरोप शिवतारे यांनी केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >> खोक्यांवरून माफी मागा, अन्यथा न्यायालयात खेचणार!; शिंदे गटाचा शिवसेना, राष्ट्रवादीला इशारा

इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
bjp royal family members ticket
Video: ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

“आरोप करणे सोपे आहे. मात्र त्यांना पुरावे द्यावे लागतील. मागील काही दिवसांपासून ते महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमित करत आहेत. ४० आमदार १२ खासदार बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराने प्रेरित होऊन बाहेर पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आमचे खच्चीकरण करत आहे, अशी भूमिका या आमदारांची होती. शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या हिताला बाधा येत असल्यामुळे हे आमदार बाहेर पडले. मात्र आता विरोधकांकडून गोबेल्स नीतीचा वापर केला जात आहे. नकारात्मक प्रचार केला जात आहे,” असे विजय शिवतारे म्हणाले.

हेही वाचा >> न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ!

“खोक्यांसंदर्भात बैलांच्या झुलीवरही लिहिण्यात आलेले आहे, असे यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले होते. अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केले, ते चुकीचे आहे. सुप्रिया सुळे या संसदरत्न आहेत. त्यांच्याबद्दल असे बोलायला नको होतो. याबाबत आम्हालाही खंत आहे,” असेदेखील शिवतारे म्हणाले.

हेही वाचा >> “महाविकास आघाडीचे नेते रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात”; शिंदे गटातील खासदाराचा गौप्यस्फोट

“मात्र सुप्रिया सुळे यांनीदेखील खोके म्हणत टीका केली. लोकांनी किती सहन करायचे. अब्दुल सत्तार यांनी यातूनच प्रतिक्रिया दिली. बाकीच्या आमदारांमध्येही याबाबत खंत आहे. जे लोक त्यांना निवडून देत आहेत, त्यांना हा संशय येत आहे. बायकोलादेखील अशी शंका येत असेल तर किती वाईट आणि त्रासदायक आहे. याच उद्वेगातून, त्रासातून या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी ते समजून घ्यायला हवे,” असे शिवतारे म्हणाले.