शीतपेय बनवणारी कंपनी कोका-कोला रत्नागिरीत २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. कंपनीच्या रत्नागिरीत होऊ घातलेल्या प्रकल्पाच्या ७०० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात दोन ते तीन हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार प्राधान्याने कोकणचा विकास करणार आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, कोका-कोला कंपनी महाराष्ट्रात त्यांचा प्रकल्प सुरू करतेय. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा राज्य सरकारकडून पुरवल्या जातील. कोकणचा विकास झाला तर इथल्या तरुणांना-तरुणींना कामासाठी कुटुंब सोडून मुंबई-ठाण्यात जावं लागणार नाही. त्यामुळे आम्ही कोकणच्या विकासाला प्राधान्य देत आहोत. राज्य सरकार केवळ कोकणी माणसाला वापरून घेणार नाही. या कोकणी माणसाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर, शिवसेनेवर प्रेम केलं. परंतु, त्यांना काय मिळालं?

Ashok gehlot
राजस्थानात फोन टॅपिंगप्रकरणी मोठे गौप्यस्फोट, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोतांवर गंभीर आरोप!
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Baban Gholap
शिंदे गटात प्रवेश करून बबन घोलप यांनी काय साधले ?
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

कोकणच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प येतात तेव्हा त्याला विरोध केला जातो. काही लोक केवळ विरोध करण्याचं काम करतात, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली. कारण नाणार आणि बारसू या प्रकल्पांना ठाकरे गटाने विरोध केला होता.

हे ही वाचा >> “सरकार बदलल्यावर काय काय अडचणी येतात आणि…”; कोका-कोलावर बोलताना एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री म्हणाले, कोका-कोला कंपनी रत्नागिरीत कार्यान्वित होत आहे. आमच्याकडून कोकणी माणसाची फसगत होणार नाही. सरकार कोकणी माणसाचा विश्वासघात करणार नाही. कोकणात कॅबिनेट बैठकीची आवश्यकता असेल तर तेही होईल. आमच्या कॅबिनेटने आतापर्यंत प्रत्येक बैठकीत कोकणच्या विकासाला प्राधान्य दिलंय.