मच्छीबाजार भागात झालेल्या भीषण दंगलीस दीड महिना होत असताना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ११ संशयितांना अटक केली. या संशयितांची न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. शुक्रवारी रात्री शहरातील ११ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यात सिद्धार्थ अहिरे, संजय ऊर्फ सतपाल अहिरराव, राकेश ऊर्फ मोत्या कढरे, पंकज सूर्यवंशी, शेख कलीम फकिरा अहमद, रफिक ऊर्फ जुंबऱ्या अन्सारी, जाकीर हुसेन अन्सारी, वहीद खाटीक, जुबेर शेख नुरोद्दीन अन्सारी, सलमान हाफीज व महेश ऊर्फ छोटू सुरेश थोरात यांचा समावेश आहे. या सर्व संशयितांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकसत्राबद्दल पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली. या संदर्भात आझादनगर पोलीस निरीक्षक डी. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2013 रोजी प्रकाशित
धुळे दंगलप्रकरणी अकरा संशयितांना पोलीस कोठडी
मच्छीबाजार भागात झालेल्या भीषण दंगलीस दीड महिना होत असताना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ११ संशयितांना अटक केली. या संशयितांची न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
First published on: 24-02-2013 at 02:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elevan suspected arrested on dhule riot matter