शहराजवळील जालगाव येथील चिन्मय एजन्सीमार्फत श्रीप्रीतीवर्धन मंगल कार्यालय येथे नामांकित प्रकाशन संस्थांचे पुस्तक प्रदर्शन तसेच ऊर्जा बचतीच्या घरगुती साधनांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. १२ ते १४ एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते रात्रौ ८ या वेळेत हे प्रदर्शन दापोलीवासीयांना विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनादरम्यान पुणे येथील डॉ. आनंद कर्वे व डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांचे ऊर्जाबचतीवर व्याख्यान १२ एप्रिल रोजी सायं. ६.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तसेच पुस्तक प्रदर्शनात ज्योत्स्ना प्रकाशन, मौज प्रकाशन, मनोरमा प्रकाशन तसेच कॉन्टिनेन्टल प्रकाशन या महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन संस्थांचे सर्व प्रकारचे दर्जेदार साहित्य वाचकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दापोलीतील प्रख्यात शिल्पा निजसुरे यांचे बुकमार्क, निसर्गचित्रे, कल्पर्कच्या फ्रेम्स यांचेही प्रदर्शन व विक्री या प्रदर्शनात करण्यात येणार आहे. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाला राजेश नाईक उपस्थित राहणार आहेत. दापोलीकरांनी या प्रदर्शनाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक आबा फाटक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२३५८ २८२५४१ व ९४२००४१०३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.