|| दिगंबर शिंदे

शेतातच हवामानाची माहिती देणारी यंत्रणा

Balasaheb Thorat
अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “जर ते…”
Hindutva organization, BJP, Solapur,
सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना
Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

सांगली : भारतीय शेती ही हवामानावर अवलंबून असल्यामुळे ती सतत अस्थिर मानली जाते. यामुळेच शेती करताना हवामानातील सतत होणारे बदल समजणे दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरू लागले आहे. या गरजेतूनच जत तालुक्यातील एका उच्चशिक्षित शेतक ऱ्याने आपल्या शेतातच हवामान केंद्राची उभारणी केली आहे. यातील यंत्रणेद्वारे ते ऊन, वारा, पावसाचे अंदाज घेत त्यानुसार निर्णय घेऊ लागले आहेत.

जत तालुक्यातील सचिन संख या उच्चशिक्षित शेतक ऱ्याची ही कहाणी. जत हा तसा अवर्षणग्रस्त भाग. सततच्या दुष्काळी स्थितीला तोंड देत शेती करायची आणि लहरी पावसाने हातातोंडाला आलेले पीक हातचे जायचे हे नेहमीचेच. बेभरवशाच्या नैर्सिगक वातावरणात शेती व्यवसायाला स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी संगणक अभियंता असलेल्या संख यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील शिर्वंलगाप्पा संख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतीचा अभ्यास केला. त्यांच्याकडे र्डांळब आणि द्राक्ष ही पिके घेतली जातात. ही पिके अनियमित पावसाला, लहरी हवामानामुळे रोगाला नेहमी बळी पडतात.  केवळ हवामानाचा अंदाज वेळीच लक्षात न आल्याने हे नुकसान होत होते. यामुळे त्यांनी आपल्या शेतातच हवामानाचा अंदाज देणारी ही यंत्रणा उभी करण्याचा विचार केला आणि प्रयत्नातून ती उभीदेखील केली.

अचूक माहिती

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उभ्या राहिलेल्या या यंत्रणेद्वारे त्यांना आता शेत परिसरातील तापमान, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आद्रता, द्राक्ष वेलींच्या पानांवर पडणारे दव, पानातून होत असलेले बाष्पीभवन, पर्जन्यमान याची अचूक माहिती मिळू लागली आहे.  पिकाच्या वाढीपासून ते काढणीपर्यंतचे नेमके नियोजन करणे शक्य झाले आहे.

याबाबत उदाहरण देताना संख म्हणातात,की रात्री पानावर साचलेल्या दवाची माहिती मिळाल्याने कोणता रोग येऊ शकतो याची माहिती अगोदरच मिळते. यामुळे बुरशीजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण करता येते. हवामान केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार संगणकांवर कार्यक्रम निश्चिात करून आवश्यक त्या प्रमाणात ठिबकद्बारे पाण्याचे नियोजन करता येते. या हवामान केंद्राच्या जोडीनेच त्यांनी बागेत ‘सेन्सर’ देखील बसवले आहेत. यामुळे त्यांना पाणी, अन्नद्रव्ये, खते, औषधांची नेमकी किती गरज आहे, याची माहितीदेखील अचूकपणे कळते. असे एक हवामान केंद्र उभारण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये तर एका सेन्सरसाठी २५ ते ३० हजार रूपये खर्च येत असल्याचे संख यांनी सांगितले.

सरकारच्या वतीने दिला जाणारा अंदाज हा मोठ्या प्रदेशाचा विचार करत असल्याने त्यातून स्थानिक पातळीवरील हवामानाची माहिती उपलब्ध होत नाही. यासाठी असे हवामान केंद्र मोठी मदत करू शकते. ही केंद्रे स्थानिक पातळीवर एकत्रितरीत्यादेखील उभी करता येतील. – सचिन संख