सातारा बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी ; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड!

शहर पोलिसांत गुन्हा दाखल ; एसटी कर्माचाऱ्यांच्या संपाला या घटेमुळे गालबोट लागले असल्याचे बोलले जात आहे.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या नवव्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर क्रांतीसिंह नानापाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.

सातारा आगारातील वाहक राजू पवार याने वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्यावर धावून जात त्यांच्या डोक्यात दगड घातला. यानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस तत्काल दाखल झाले. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fighting between st employees at satara bus stand msr

ताज्या बातम्या