पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा एक व्हीडिओ व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केल्याने वसईतील एका वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्रुव राठीचा हा व्हीडिओ आदेश बनसोडे यांनी फॉरवर्ड केला होता. आदेश बनसोडे हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशनचे महाराष्ट्र सचिव अधिवक्ताही आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बनसोडे यांनी पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी २० मे रोजी वसईच्या बार असोसिएशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये “माइंड ऑफ अ डिक्टेटर” या व्हीडिओची लिंक शेअर केली होती. लिंकसोबतच त्यांनी एक मेसेज लिहिला की, “मतदानाला जाण्यापूर्वी व्हिडिओ पहा.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Vasai, fake police, keychain,
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

हेही वाचा >> युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”

हा व्हीडिओ शेअर केल्याबद्दल बनसोडे यांच्याविरोधात ग्रुपमधील एका वकिलाने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी, मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी स्वत: तक्रार दाखल केली आणि २१ मे रोजी गुन्हा नोंदवला. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की आरोपीने शेअर केलेल्या व्हीडिओने पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले आहे. कारण त्याच्या संदेशात उमेदवारांबद्दल खोटे दावे करण्यात आले आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. मतदानाच्या निमित्ताने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी १८ मे ते २० मे दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता.

माझ्याविरोधातील एफआयआर बेकायदा

बनसोडे यांनी एफआयआर बेकायदा ठरवत लोकांचा आवाज दाबण्यासाठी ही राज्याची चाल असल्याचा आरोप केला. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १८८ (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा) एफआयआर दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही, असेही ते म्हणाले. बनसोडे म्हणाले, “सीआरपीसी कलम १९५ नुसार, आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यापूर्वी पोलिसांना संबंधित न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.”

“तो व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी इंटरनेटवर पाहिला , लाईक केला आणि शेअर केला आहे. या सर्वांवर पोलीस गुन्हा दाखल करणार का? मी बेकायदा एफआयआरचा निषेध करत आहे”, असंही बनसोडे म्हणाले.