जिजाऊ महिला मंडळ अलिबाग यांच्या वतीने ३० व ३१ डिसेंबर रोजी दोन दिवस सायंकाळी ४.०० वाजल्यापासून आंग्रेवाडा परिसर जुन्या नगरपालिकेजवळ श्रीदत्त मंदिरासमोर खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खवय्यांसाठी खास खाद्यपर्वणी म्हणून वैविध्यपूर्ण महाराष्ट्रीयन खाद्य परंपरेने समृद्ध अशा विविध प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची रेलचेल महोत्सवात असणार आहे. अलिबाग परिसरातील महिलांनी एकत्र येऊन या महिला मंडळाची स्थापना केली असून, त्यांच्या वतीने हौशी व होतकरू गृहिणींचे या महोत्सवात स्टॉल असणार आहेत, अशी माहिती जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा भैरवी रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. पूर्वाचल म्हणजे भारताच्या उत्तर पूर्वेकडील सात राज्यांचा समूह वास्तविक हा भारताचाच एक अविभाज्य भाग, परंतु उर्वरित भारतात या भागाबद्दल विशेष माहिती असलेली दिसून येत नाही. आपल्यापैकीच एक भाग असूनही हा विभाग आपल्यासाठी नेहमी गूढ आणि अगम्य राहिला आहे. या भागाबद्दल आणि तेथील समाजजीवनाबद्दल माहिती देणारे एक दालन या प्रदर्शनात प्रदर्शित केले जाणार आहे. त्याचबरोबर पूर्वाचल विकास प्रकल्पाद्वारे डोंबिवली येथे चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहासाठी एक बंधुत्व संकल्पनिधी गोळा करण्याचा मंडळाचा मानस आहे. सर्वानी खाद्य महोत्सवातील पदार्थाचा आस्वाद घ्यावा आणि नवीन वर्षांचे उत्साहात स्वागत करावे, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा भैरवी आंग्रे यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2012 रोजी प्रकाशित
जिजाऊ महिला मंडळातर्फे अलिबागमध्ये खाद्य महोत्सवाचे आयोजन
जिजाऊ महिला मंडळ अलिबाग यांच्या वतीने ३० व ३१ डिसेंबर रोजी दोन दिवस सायंकाळी ४.०० वाजल्यापासून आंग्रेवाडा परिसर जुन्या नगरपालिकेजवळ श्रीदत्त मंदिरासमोर खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 29-12-2012 at 05:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food festival in alibaug by jijau ladies association