पाषाणमध्ये राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांचे पुत्र तुषार आणि चेतन यांनी चुलतभाऊ प्रतीक रामभाऊ निम्हण (वय १९) याचा शुक्रवारी रात्री गोळ्या घालून खून केला. या हल्ल्यात तिघेजण जखमी आहेत. हल्ल्यानंतर तुषार आणि चेतन फरारी झाले असून मुन्ना संभाजी निम्हण याला अटक झाली आहे. दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत तानाजी निम्हण यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीत रामभाऊ निम्हण यांच्या पुतण्याच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले होते. त्या  निवडून आल्याने तानाजी आणि रामभाऊ निम्हण यांच्यात वैर होते.