scorecardresearch

Premium

सांगली : हो-नाही करत माजी महापौर सुर्यवंशी अजित पवारांच्या गटात

आपण कायम आमदार जयंत पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगणारे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये सहभागी होत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.

Digvijaya Suryavanshi joined Ajit Pawar group
सांगली : हो-नाही करत माजी महापौर सुर्यवंशी अजित पवारांच्या गटात (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : आपण कायम आमदार जयंत पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगणारे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये सहभागी होत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. यावेळी त्यांच्यासमवेत शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, अ‍ॅड. अमित शिंदे हे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुर्यवंशी यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. ही भेट वैयक्तिक पातळीवरील असून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता. मात्र, आज त्यांनी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असल्याचे जाहीर केले. यामुळे सांगलीतील आमदार पाटील यांच्या गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

indi Alliance
“इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा! भाजपा फूट पाडत असल्याचाही गंभीर आरोप
ajit pawar marathi news, ajit pawar rohit pawar, rohit pawar ed notice marathi news,
“आम्ही त्याचा इव्हेंट करत नाही, माझी ५ तास चौकशी झाली…”, रोहित पवारांच्या ईडी नोटीशीवर अजित पवार म्हणाले…
liquor bottles Subhash Chandra Bose memorial nagpur municipal corporation marathi news
नागपुरात सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाजवळ मद्याच्या रिकाम्या बाटल्या! विविध संघटनांकडून संताप व्यक्त
Bharat Jodo Nyay Yatra
राहुल गांधी अन् सरमा यांच्यातील वादाला जुनी किनार? सरमा काँग्रेसमध्ये असताना नेमकं काय घडलं होतं?

हेही वाचा – मराठवाड्यातील शेती संकटात, देशभरातील ३१० जिल्ह्यांना बदलत्या पर्यावरणाचा फटका

मुदत संपलेल्या महापालिकेत राष्ट्रवादीचे १५ सदस्य होते, यापैकी दोन नगरसेवकांनी यापूर्वीच अजित पवार गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. उर्वरित सदस्यापैकी १० जण आपल्या संपर्कात असल्याचा दावा शहर जिल्हाध्यक्ष प्रा. जगदाळे यांनी यावेळी केला. सांगली शहर कार्यकारिणीमध्ये बदल होणे अपेक्षित असतानाही आमदार पाटील यांनी बदल केला नाही. यामुळे त्यांच्या गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असून बरेच जण संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सांगली दौर्‍यावेळी ही संख्या वाढल्याचे दिसेल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – सिंचनवृद्धीमध्ये सांगली मंडळ राज्यात अव्वल

ग्रामीणचे अध्यक्ष पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार दिलेला शब्द पाळणारे नेते असल्याने कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्‍वासाची भावना आहे. पक्षाचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी लवकरच खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव आणि तासगाव या पाच तालुक्यांत संपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former mayor digvijaya suryavanshi joined ajit pawar group ssb

First published on: 08-12-2023 at 18:47 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×