scorecardresearch

भाजप जिल्हा सरचिटणीसाला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

तरुणीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

rape victim
प्रातिनिधीक छायाचित्र

भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे याला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्हाखाली अटक केली आहे. एका तरुणीच्या तक्रारीनंतर नागभीड पोलीस ठाण्यात बावनथडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर रवींद्र बावनथडे फरार झाला होता. अखेर फरार बावनथडेला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.

एका खासगी बसमध्ये प्रवास करताना तरुणीशी अश्लील चाळे करतानाचा रवींद्र बावनथडेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपवर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. नागपूरवरून येणाऱ्या एका खासगी बसमध्ये ५० वर्षांची व्यक्ती व एक युवती मागच्या आसनावर बसले होते. काही वेळाने दोघांचे अश्लील चाळे सुरू झाले. हा संपूर्ण प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

कॅमेऱ्याद्वारे दृश्याचे चित्रीकरण होत असताना कॅबिनमध्ये बसलेल्या बसच्या कर्मचाऱ्यांनी तो बघितला आणि नंतर व्हॉट्स अॅपवर तो त्याच दिवशी व्हायरल झाला. पाहतापाहता हजारो लोकांपर्यंत ही चित्रफित पोहोचली. त्यानंतर पीडित तरुणीने रविवारी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार केली. रवींद्र बावनथडे याने नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केले, असे तिने तक्रारीत नमूद केले.

रवींद्र बावनथडे शाळेत शिक्षक असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आरमोरी क्षेत्राची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पोलिसांनी विनयभंग आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली रवींद्र बावनथडेला अटक केली आहे. नागभिड पोलिसांनी ब्रम्हपुरीमधून बावनथडेला ताब्यात घेतले. बावनथडेला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजपचे नेते आणि गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी मात्र रवींद्र बावनथडे भाजपचे सदस्य नसल्याचे म्हटले आहे. ‘रवींद्र बावनथडे आधी पक्षाचे पदाधिकारी होते. बावनथडे वारंवार पक्षाच्या बैठकांना अनुपस्थित राहिल्याने त्यांची जिल्हा सरचिटणीस पदावरुन हकालपट्टी करण्यात आली,’ असे नेते यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-07-2017 at 12:29 IST

संबंधित बातम्या