मागील काही दिवसांपासून नर्तिका गौतमी पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आहे.ती अश्लील नृत्य करते, असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी काहीजणांनी केली होती. दरम्यान, तिच्या कार्यक्रमात उत्साही प्रेक्षकांनी धुडगूस घातल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. संबंधित घटनेचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटना ताज्या असताना आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी धुडगूस घातला आहे.

पुण्यातील खेड तालुक्यातील भैरवाडी येथे रीलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमस्थळी ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ असं लिहिलेले पोस्टर झळकले होते. या कार्यक्रमात काही तरुणांनी धुडगूस घातला आहे. यावेळी गौतमीच्या अदाकारीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, तरुणांच्या एका टोळक्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांवर कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली.

हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

या प्रकारानंतर गावातील काही महिलांनी हातात काठ्या घेऊन हुल्लडबाज तरुणांना चोप दिला आहे. त्यांनी हातात काठ्या घेऊन उत्साही तरुणांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक गाण्यानंतर तरुणांचा गोंधळ सुरूच राहिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

हेही वाचा- तरुणांनी धुडगूस घातल्यानंतर गौतमी पाटीलने कार्यक्रम थांबवला, व्हिडीओ आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे यापूर्वीही अनेकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातला आहे. अशाच प्रकारचा गोंधळ संबंधित कार्यक्रमात पाहायला मिळाला. पण यावेळी मात्र गावातील महिलांनी हातात काठ्या घेऊन धुडगूस घालणाऱ्या तरुणांना चोप दिला आहे.