जमीन खरेदीच्या काही विशिष्ट नोंदी करून सात-बारा उतारा देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी निफाड तालुक्यातील सजा देवगावचे तलाठी त्र्यंबक पोपट मवाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
वडिलांनी नावे केलेल्या एक गुंठा जमिनीच्या खरेदीचे इंडेक्स २ वरून तलाठी यांच्या १० ड मध्ये नोंद करून तसा सात-बारा उतारा देण्यासाठी मवाळने सात हजार रुपयांची तक्रारदाराकडे मागणी केली होती. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. त्यानुसार दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास निफाड तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरील हॉटेलमध्ये ही रक्कम स्वीकारत असताना मवाळला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. व्ही. अहिरराव यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. शासकीय कार्यालयात कोणीही अधिकारी वा कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कोणी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी ०२५३-२५७५६२८, २५७८२३० अथवा ९१५८२ ४२४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
निफाड तालुक्यातील लाचखोर तलाठी जेरबंद
जमीन खरेदीच्या काही विशिष्ट नोंदी करून सात-बारा उतारा देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी निफाड तालुक्यातील सजा देवगावचे तलाठी त्र्यंबक पोपट मवाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
First published on: 21-12-2012 at 05:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grafter talathi arrested in nifat taluka