सुभेदारवस्ती भागातील वेश्यावस्तीत जमावाने हल्लाबोल केला. सुमारे १०० हून अधिक घरांची तोडफोड करत जाळपोळ केली. घरातील सामानांचीही लुटमार केली. ५०० लोकांचा जमाव बेफाम होऊन घरे उद्ध्वस्त करीत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. तक्रार द्यायला कोणी आले नाही, असे कारण सांगत पोलिसांनी फिर्यादही नोंदविली नाही.
पोलीस अधिकाऱ्यांसमोर बेधुंद झालेला जमाव सुमारे अर्धा ते एक तास धुमाकूळ घालत होता. पण त्यांना आवरले नाही. घरांची मोडतोड व जाळपोळ झाल्यानंतर काहींनी सामान लुटून नेले. एवढे होऊनही तक्रार आल्यास कारवाई करु, असे सांगितले. एक वस्ती बेचिराख करुनही अगा जे घडलेच नाही असे पोलिसांचे वागणे होते. पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन मुलीला विकून येथील कुंटणखान्यात वेश्या व्यवसायाला लावण्यात आले होते. त्यानंतर तेथे कारवाई करण्याच्या मुद्दय़ावरून रविवारी ही घटना घडली.