विधवा महिलांनाही समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी खास विधवांसाठी रविवारी संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी दिली. रविवारी दुपारी डेक्कन मॅन्युफॅक्चिरगच्या सभागृहात विधवा जागृती संमेलन होणार आहे.
विधवा महिला हक्क संघटनेच्या आटपाडी येथील अध्यक्ष लता बोराडे यांनी विधवा महिलांना ग्रामीण भागात आजही सुवासिनीचा दर्जा नाकारला जात असल्याची खंत व्यक्त केली होती. महिलांचा खास असलेल्या हळदी-कुंकू समारंभासाठी विधवांना जाणीवपूर्वक टाळले जाते. विशेषत: कोणत्याही शुभारंभप्रसंगी विधवांना टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत व्यक्त केली.
यामुळे विधवांनाही समाजात स्थान मिळावे यासाठी खास त्यांच्यासाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.