केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून आज (२४ फेब्रुवारी) रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले. त्यासाठी रायगडावर खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला अत्यंत चांगलं आणि ऐतिहासिक चिन्ह मिळालं आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच उत्साहाचं वातावरण होतं”, असं संजय राऊत म्हणाले.

Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
BJP's sitting MP Unmesh Patil from Jalgaon joined Shiv Sena UBT on Wednesday .. Express Photo by Amit Chakravarty
“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप
Mahendra Thorve
सुनील तटकरेंचाही कडेलोट करावा लागेल… शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे धक्कादायक वक्तव्य

हेही वाचा >> ‘भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना काहीच मिळणार नाही’, काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…

…तर समोर येऊन सांगावं

“भाजपाने अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला आहे की तुमचे उमेदवार कमळावर लढतील. धनुष्यबाण मिळालं असलं तरीही लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. घड्याळ जरी दिलं असलं तरीही तुम्हाला लोक मतदान करणार नाही. त्यामुळे तुम्ही कमळावर लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे. पी. नड्डा यांनी दिला आहे, हे जर खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं”, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.

हेही वाचा >> तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे – चंद्रशेखर बावनकुळे

भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल

“ज्या दोन गटांनी चिन्ह चोरलं त्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढण्याची हिंमत नाही. भाजपालासुद्धा हे फुटलेले दोन गटांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर निवडवणूक लढवण्याचं धाडस नाहीय. या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही मशाल चिन्ह घेऊन लढेल आणि शरद पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.