मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी मक्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार ३५१ क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. आवक ३००० क्विंटल होती. या हंगामातील विक्रमी व उच्चांकी भावामुळे उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठेत मक्याची मागणी वाढली असताना आवकेतही वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे मक्याचा दर तेजीत आहेत. १२१२ ते १३५१ सरासरी १३३० रुपये असे भाव मिळाले. उत्पादकांनी मका वाळवून स्वच्छ करून विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अंकुश कातकडे यांनी केले आहे. दरम्यान, उन्हाळ कांद्याची सोमवारी चार हजार क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. ६०३ ते ११०१ रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याचे व्यवहार झाले. लाल कांद्याची दोन हजार क्विंटल आवक होऊन दर प्रति क्विंटल ५५० ते १३६१, तर सरासरी ११४१ रुपये क्विंटल राहिले. मेथीच्या १५०० जुडय़ांची आवक होऊन ३७० रुपये शेकडा सरासरी भाव होता. कोथिंबीर ६०० जुडय़ांची आवक होऊन ३५० रुपये शेकडा भाव होता.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
मक्यास विक्रमी भाव
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी मक्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार ३५१ क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. आवक ३००० क्विंटल होती. या हंगामातील विक्रमी व उच्चांकी भावामुळे उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
First published on: 20-11-2012 at 06:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest rate for corn