लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा आरक्षण आंदोलकांनी माढा लोकसभा मतदारसंघात दीड हजार उमेदवार उभे करण्याचा मनोदय बोलून दाखविल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी, माढ्यात एवढ्या संख्येने उमेदवार उभे राहणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने उमेदवार उभे राहिल्यास मतदान यंत्राऐवजी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

nagpur, bjp, Low Voter Turnout, voter names missing, voter list, Meticulous Planning, lok sabha 2024, election 2024, nagpur news, election news, voting news,
नागपूरमध्ये मतदान कमी, भाजपमधील अस्वस्थतेची कारणे काय?
in Yavatmal-Washim Constituency Uddhav Thackerays candidates will lose Due to the election symbol
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…
water Mumbai, water distribution,
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
Congress election manifesto published Caste wise census
जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 

एका लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची क्षमता ३८४ उमेदवार उभे राहण्याच्या मर्यादेपर्यंत असू शकते. त्याला २४ बॅलेट युनिट जोडू शकतो आणि मतदान यंत्रावर (ईव्हीएम) घेता येऊ शकेल. मात्र, मर्यादेपेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास थेट मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) मतदान घ्यावे लागेल. अशी परिस्थिती येईलच असे आताच सांगता येणार नाही. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर आणि नेमक्या उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर गरज भासल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले जाईल. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकल मराठा समाजाच्या भावना आपण समजू शकतो. परंतु मर्यादेपलिकडे उमेदवार उभे राहिल्यास निवडणूक प्रक्रियेला बाधा येऊ शकते, असे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा- मोठी बातमी! ठाकरे गटाचा महत्त्वाचा शिलेदार शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

सोलापूर राखीव व माढा लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत असल्यामुळे मधले ५१ दिवस मिळणार आहेत. सोलापूर मतदारसंघासाठी एकूण २० लाख ९५२२.तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी एकूण १९ लाख ८१ हजार १५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोलापुरात पुरूष मतदार दहा लाख ३१ हजार १०९ तर महिला मतदार नऊ लाख ७८ हजार २१५ आणि इतर मतदारांची संख्या १९८ आहे. माढा मतदारसंघातील पुरूष मतदार आठ लाख ५१ हजार २३३ तर महिला मतदार सात लाख ८१ हजार ६८९ आणि इतर मतदारांची संख्या ५९ एवढी आहे.

सोलापूर मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदारसंघांमध्ये मतदारसंख्या अशी : मोहोळ-तीन लाख १७ हजार ८३९, सोलपूर शहर उत्तर-तीन लाख ७६६७, सोलापूर शहर मध्य-तीन लाख २१ हजार ३९३, अक्कलकोट-तीन लाख ५६ हजार ५०९, सोलापूर दक्षिण-तीन लाख ५१ हजार २५३ आणि पंढरपूर-मंगळवेढा-तीन लाख ५४ हजार ८६१.

आणखी वाचा- “मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत

माढा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : करमाळा-तीन लाख १६ हजार ४६७, माढा-तीन लाख ३५ हजार ३४२, सांगोला-तीन लाख १० हजार ४४१, माळशिरस-तीन लाख ३५ हजार ८७७, फलटण-तीन लाख ३४ हजार ८५५ आणि माण-तीन लाख ४८ हजार १६८.

सोलापूर व माढ्यात ८५ वर्षांवरील वृध्द मतदारांची संख्या ५४ हजार ९९१ तर १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदारांची संख्या ५२ हजार ७८३ आहे. दिव्यांग मतदारांची संख्या २७ हजार १९४ एवढी आहे. तर ४५९१ सैनिक मतदार आहेत. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ३५९९ मतदान केंद्रे असून साह्यकारी मतदान केंद्रांची संख्या ३६१७ इतकी आहे. एकूण २७ मतदान केंद्रे संवेदनशील मानली जातात.