सावंतवाडी  : अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे कोकणातील बागायतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी, फलोत्पादन मंत्री यांना देखील माहिती द्या. अशी सूचना पवार यांनी श्री भोसले, डॉन्टस यांना केली.

सिल्व्हर ओक येथे कोकणातील फलोत्पादन अभियानाचे प्रणेते शरदचंद्र पवार यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस यांनी भेट घेऊन अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे आंबा, काजू,कोकम, जांभुळ,सुरंगी व अन्य फळबागांची नुकसानी झाली आहे. बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत त्यामुळे नुकसान भरपाई मिळायला हवी याकडे लक्ष वेधून निवेदन दिले.

नाम.पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,कोकणात प्रामुख्याने हापूस आंबा,काजू हि दोन प्रमुख पिके असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी , रायगड या जिल्हयांमध्ये आंबा पिक मोठयाप्रमाणात घेतले जाते. आपल्या प्रयत्नंमुळे शेतकरम्य़ांनी रोजगार हमी योजनेखाली मोठया प्रमाणात फळबागायती लागवड केली. सिंधुदुर्ग,रत्नगिरी या जिल्हयांमध्ये उत्पादित होणारा हापूस आंबा जगप्रसिध्द आहे. परंतू चालू वर्षभरात सततच्या बदलत्या हवामानामुळे या पिकांवर अनिष्ठ परिणाम झालेला आहे. माहे डिसेंबर—जानेवारी मध्ये झाडांना फुलोरा येणाऱ्या कालावधीमध्ये झालेला अवकाळी पाऊस तसेच मे मध्ये सुरू झालेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे.

 गेल्यावर्षी १६—१७ मे पासून पाऊस सुरू झाला होता. तर यावर्षी १०—१२ मे वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. शेतकरम्य़ांचा अजून ५० टक्के पासूनच पावसाळी आंबा झाडावरच असून अवेळी सुरू झालेल्या पावसामुळे व बदलत्या वातावरणामुळे बराच आंबा झाडावरून गळून पडत आहे. तर काही ठिकाणी तो सडून जात आहे.

जिल्हयातील अन्य पिके उदा. कोकम, जांभूळ अद्यप तयार झालेली नाहीत. पिक तयार होण्यापूर्वी पाऊस झाल्याने ती पिके पुर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असून, शेतकऱ्यांवर हवादिल होण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये लक्ष घालून कोकणातील शेतकरम्य़ांना फळपिकविमा पुर्णपणे मिळण्यासाठी तसेच त्यांच्या होणारम्य़ा नुकसानीबाबत प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी संबंधित यंत्रणेला आपणाकडून आवश्यकते आदेश व्हावेत, अशी मागणी प्रवीण भोसले व व्हिक्टर डॉन्टस यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

आपण लक्ष घालतो असे शरदचंद्र पवार यांनी सांगितले, ते म्हणाले, मुख्यमंत्री, कृषी फलोत्पादन मंत्री यांनीही निवेदन द्या. अशी सूचना केली. प्रवीण भोसले म्हणाले, आम्ही कोकणातील फलोत्पादन अभियान प्रणेते शरदचंद्र पवार यांना भेटून निवेदन देत त्यांना बदलत्या हवामानामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत याकडे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भेटणार आहोत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी फलोत्पादन मंत्री दादा भुसे यांनीही भेटणार आहोत.