नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गतचा संघर्ष चिघळला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. थोरातांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अशातच बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांना या प्रकरणाबाबत पत्रकारांनी विचारणा केली. यावर जयश्री थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. त्या मंगळवारी (७ फेब्रुवारी) अहमदनगरमध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर मुलगी जयश्री थोरात यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, “अद्याप माझ्याबरोबर अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मी त्या विषयावर काहीही बोलू शकणार नाही. ते जेव्हा व्यथित होतात तेव्हा आम्हा सर्वांनाच वाईट वाटतं. मात्र, मी या विषयावर काहीही बोलू शकणार नाही.”

Balasaheb Thorat
अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “जर ते…”
Hindutva organization, BJP, Solapur,
सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना
Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

व्हिडीओ पाहा :

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

काँग्रेसमधील राजकारणावर बाळासाहेब थोरात म्हणाले होते, “विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल.”

“गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे,” असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा : बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

“महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणलं जात आहे, त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ,” असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला होता.