‘केबीसी’ घोटाळ्यामुळे नुकसान झालेल्या राज्यभरातील गुंतवणूकदारांची गुरुवारी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एकच रीघ लागली. संध्याकाळपर्यंत तक्रारींची संख्या २५०हून अधिक झाली होती. या प्रकरणातील प्रमुख संशयित केबीसीचा संचालक भाऊसाहेब व त्याची पत्नी आरती चव्हाण हे परदेशात परागंदा झाले आहेत काय, याची छाननी करतानाच पोलिसांनी विमानतळ सुरक्षा व्यवस्थेस सतर्कतेचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन या प्रश्नावर लढा देण्यासाठी समितीची स्थापना केली.
केबीसी कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी, या मागणीसाठी छावा मराठा संघटनेच्या वतीने गुरुवारी काढण्यात
येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. यामुळे इदगाह मैदानावर गुंतवणूकदारांनी जोरदार आंदोलन केले.