scorecardresearch

Premium

माळशेज घाट बंद!

मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात डोंगराच्या कडय़ाचा भाग कोसळला असून त्यामुळे अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक व्यवस्था खंडाळामार्गे वळविण्यात आली आहे.

माळशेज घाट बंद!

मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात डोंगराच्या कडय़ाचा भाग कोसळला असून त्यामुळे अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक व्यवस्था खंडाळामार्गे वळविण्यात आली आहे.
माळशेज घाटातील बोगद्याच्या पुढे कल्याण बाजूकडे मोठे धबधबे आहेत. तेथील डोंगराचा मोठा भाग बुधवारी रात्री कोसळला. रस्त्यात भल्या मोठय़ा शिळा पडल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. या शिळा प्रचंड आकाराच्या असल्याने तेथील रस्तादेखील खचला आहे. याशिवाय गेल्या आठवडय़ापासून मढ, पिंपळगाव जोगे, माळशेज मार्गावर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या मार्गावरील कोळवाडी, पिंपळगाव जोगे फाटा या भागातून जाणाऱ्या महामार्गावरील रस्ताही खचून गेला आहे. रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी जे मोठे पाइप टाकले होते त्यांचे वरील भरावही वाहून गेले. काही भागांतील रस्ते खचून गेलेले आहेत. त्यामुळे या महामार्गावर आठवडय़ापासून एकेरी वाहतूक सुरू होती. त्यातच दरड कोसळल्याने मध्यरात्रीपासून वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाकडून गुरुवारी सकाळपासून जे.सी.बी., पोकलेनद्वारे मोठे दगड फोडण्याचे व ते बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती झाल्यानंतरच वाहतूक सेवा सुरळीत करण्यात येणार आहे. जी वाहने कल्याणमार्गे माळशेज घाटापर्यंत आली होती त्या वाहनांना माघारी जाऊन खंडाळामार्गे जावे लागले. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पर्यायी व्यवस्था म्हणून कल्याण-नगर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक खंडाळा मार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती ओतूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक नामदेव गवारी यांनी दिली.

Traffic jam near Charoti due to concreting work of highway
महामार्गाच्या काँक्रीटीकरण कामामुळे चारोटीजवळ वाहतूक कोंडी, पाच ते सहा किमी वाहनांच्या रांगा
Traffic changes Mumbai-Bangalore bypass
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल; मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद
Investigation of theft of gold silver vehicle nashik
सोने, चांदीच्या वाहनावरील दरोड्याचा तपास
accidents Samruddhi highway
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, गुरुवारी पहाटे खासगी बसला कंटेनरची धडक

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Landslide at malshej ghat disrupts traffic

First published on: 26-07-2013 at 05:30 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×