प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा अलीकडेच एक खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमस्थळी कपडे बदलत असताना अज्ञात व्यक्तींनी गौतमीचा खासगी व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर गौतमी पाटीलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील पहिल्यांदाच मंचावर नृत्य सादर करण्यासाठी नाशिक येथे गेली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, “मला नेहमीच प्रेक्षकांचं प्रेम मिळत आलं आहे. अजून जास्त प्रेम मिळतंय त्यामुळे आणखी छान वाटतंय. माझी बोलण्याची मनस्थिती नाहीये, तरीही मी तुमच्यासमोर आली आहे. लोक माझ्यासोबत आहेत. या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आपल्याला लोकांची साथ आहे, यामुळे खूप छान वाटतंय.”

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

हेही वाचा- “महाराष्ट्रात एका स्त्रीची…” गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडेंची संतप्त प्रतिक्रिया

कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याबाबत विचारलं असता गौतमी पाटील म्हणाली, “त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. मी यावर काहीही बोलू शकत नाही. माझी पोलिसांकडे काहीही मागणी नाही. माझं पोलिसांशी जे बोलणं चालू आहे, ते चालू आहे. मी त्या बाबतीत काहीही बोलू शकत नाही.”

हेही वाचा- गौतमी पाटीलच्या वादात अजित पवारांची एन्ट्री; थेट इशारा देत म्हणाले, “अश्लील प्रकार…”

दुसरीकडे, संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी याची दखल घेतली. संबंधित व्हिडीओ शूट करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, असा आदेश रुपाली चाकणकरांनी दिला. याबाबत विचारलं असता गौतमी म्हणाली, “मला महिला आयोगबद्दल माहीत नव्हतं.त्यानंतर मला कळालं रुपालीताईंनी दखल घेतली आहे. त्यांनी ताबोडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यामुळे बरं वाटलं.”