सोलापूर : एकेकाळी संपूर्ण राज्यात चौथ्या क्रमांकाचे औद्याोगिक शहर म्हणून गणले गेलेल्या आणि गिरणगाव ही दुसरी ओळख राहिलेल्या सोलापूरची पुढे औद्याोगिकदृष्ट्या प्रगती झाली नसली तरी अन्य क्षेत्रांत या जिल्ह्याची भरारी होत असल्याचे पाहायला मिळते. यात साखर उद्याोगापासून धार्मिक, ऐतिहासिक आणि शेती पर्यटनासह वैद्याकीय पर्यटनापर्यंत उल्लेख करता येईल.

दुसऱ्या महायुद्धात चीनमध्ये जखमी सैनिकांची रात्रंदिवस वैद्याकीय शुश्रूषा करताना मरण पावलेले थोर मानवतावादी सुपुत्र डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांच्यामुळे सोलापूरचे वैद्याकीय सेवाक्षेत्र भूषणावह ठरले आहे. मागील ६०-७० वर्षांत येथील अनेक निष्णात डॉक्टरांनी योगदान दिले आहे. त्यामुळेच सोलापूरच्या आसपास मराठवाड्यासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील रुग्ण सोलापुरात वैद्याकीय उपचारासाठी येत असून, या शहराचे आता वैद्याकीय पर्यटन विकसित होत आहे. येथे सुमारे चारशे रुग्णालयांतून सुमारे दहा हजार खाटांच्या माध्यमातून सेवा दिली जाते. येथील वैद्याकीय पर्यटनाविषयी डॉ. व्यंकटेश मेतन यांनी केलेल्या संशोधनानुसार येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून येतात. तुलनेने स्वस्त आणि दर्जेदार वैद्याकीय उपचार मिळत आहेत. अलीकडे आरोग्य विभागाकडून सोलापुरात प्रत्येकी १०० खाटांच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालय आणि महिला व नवजात शिशू रुग्णालयाची भर पडली आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये राज्यात प्रथमच जिल्हा नियोजन समितीमार्फत एक कोटी ४२ लाख रुपयांच्या खर्चातून फायर ऑडिट व इलेक्ट्रिकल ऑडिटसह अग्नी प्रतिबंधक सुरक्षेशी संबंधित उपकरणे आणि साधनसामुग्रींचे ऑडिट पूर्ण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात एएनएम व जेएनएम नर्सिंग कॉलेजसह परिचारिका प्रशिक्षण केंद्र उभारण्यासह हृदयरोग विभाग तसेच लोकसहभागातून डायलिसिस सेंटर उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

uday samant 7
‘शिंदे यांच्याकडील नगरविकास, रस्ते विकास खाती मी नाकारली’
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Jitendra Awhad on Ajit pawar and Sharad pawar
‘मी शरद पवारांचा मुलगा असतो तर?’, जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले, “सरंजामशाही…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हेही वाचा >>>‘शिंदे यांच्याकडील नगरविकास, रस्ते विकास खाती मी नाकारली’

पंढरपुरात शंभर खाटांचे तर अकलूज आणि करमाळ्यात प्रत्येकी ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालये कार्यरत असून त्याशिवाय प्रत्येकी ३० खाटांची १६ ग्रामीण रुग्णालये आहेत. पंढरपुरात आणखी १०० खाटांचा विस्तार होत आहे. आरोग्य व्यवस्था बळकटीकरणाचा भाग म्हणून आणखी सात ग्रामीण रुग्णालये उभारली जात आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये सध्या ८८० खाटांची वैद्याकीय व्यवस्था आहे. सोलापूर महापालिकेची रुग्णालयेही लोकसहभागातून विकसित झाली असून यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाचा कायापालट झाला आहे. जिल्हा परिषदेची रुग्णालयेही पूर्वीच्या तुलनेत सुसज्ज झाली आहेत. करमाळा सोलापूरशिवाय अकलूज, बार्शी येथील वैद्याकीय सेवा क्षेत्र लौकिकप्राप्त आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात सुपर स्पेशालिटीच्या अनुषंगाने आणखी मोठा वाव आहे. हृदयरोग, किडनी, कर्करोग व अन्य विभाग सुरू होणे गरजेचे असून त्याबाबतचे प्रस्ताव शासन दरबारी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. रुग्णालयाच्या विस्तारासाठी आसपास मोकळे भूखंड वर्षानुवर्षे पडून आहेत. शासकीय रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयासह महिला व नवजात शिशु रुग्णालयांमध्ये विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असून मनुष्यबळाचा अभाव आहे.