मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, बोल्शेविक पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबरला दुपारी ४ वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात ‘विदेशी गुंतवणूक आणि सध्याची राजकीय परिस्थिती’ या विषयावर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव कॉ. प्रकाश करात आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी महासचिव कॉ. ए.बी. बर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कॉ. मोहनदास नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, फॉरवर्ड ब्लॉकचे धर्मराज दुबे, माकपचे कॉ. आलसी, भाकपाचे हनुमंत दीक्षित यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मनोहर मुले, जम्मू आनंद, अरुण वनकर, राजू डबले, अरुण लाटकर आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2012 रोजी प्रकाशित
डाव्या पक्षांचे २२ डिसेंबरला संमेलन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, बोल्शेविक पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबरला दुपारी ४ वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात ‘विदेशी गुंतवणूक आणि सध्याची राजकीय परिस्थिती’ या विषयावर संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

First published on: 08-12-2012 at 06:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left parties convention on 22nd december