कविता नागापुरे

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले, मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रतीक्षा आहे ती चार जून रोजीच्या मतमोजणीची. मतदान ते मतमोजणी या दरम्यानच्या कालावधीत उमेदवार, राजकीय पक्ष आणि विश्लेषकही आपापल्या परीने मतदानाच्या आधारे निकालाचे अंदाज बांधत आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतदानादरम्यान निर्णायक ठरलेल्या मुद्द्यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न…

Congress Leader P N Patil
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
hazaribagh sinha family haunts bjp loksabha
भाजपाला हजारीबागच्या ‘या’ कुटुंबाची भीती? कारण काय?
maharashtra politics marathi news
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी…
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

भंडारा-गोंदिया

 पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान (७१.३२ टक्के) साकोली विधानसभा मतदारसंघात झाले असून येथील मतदारांचा कौल हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सुमारे पाच ते सव्वापाच लाख मते घेणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, असे जाणकारांचे मत आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती. महायुतीकडून भाजपचे विद्यामान खासदार सुनील मेंढे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात चुरस होती. विधानसभेच्या सहापैकी साकोली विधानसभा मतदारसंघात विक्रमी (७१.३२ टक्के) मतदान झाले आहे. साकोली हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थांतही दबदबा आहे. तर दुसरीकडे पटोलेंचे कट्टर विरोधक भाजपचे माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी साकोलीला आपली कर्मभूमी मानल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसाठी साकोलीतील मतदान निर्णायक करण्याची शक्यता आहे.

मोहाडी व तुमसर तालुक्यांतील विणकर, दलित समाजाची मते उमेदवाराला येथून मताधिक्य देण्यास महत्त्वाची ठरतील. गोंदियात भाजप-काँग्रेसमध्ये होणारी शहरी-ग्रामीण मतविभागणीही लक्षवेधक असेल. गोंदिया हा खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा आहे. त्यामुळे ते इथे महायुतीच्या उमेदवारासाठी कितपत प्रभावी ठरतात, त्यावरही विजयाचे गणित ठरेल.

अमरावती; ‘प्रहार’ कुणावर?

मोहन अटाळकर

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने मिळवलेले मतदान आणि दलित, मुस्लीम व कुणबी मतांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसने केलेली धडपड यात प्रहार जनशक्ती पक्षामुळे झालेली मतविभागणी कुणाच्या पथ्यावर पडते, याचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी निवडणूक प्रचार सुरू होण्याआधीच हिंदुत्वाचा झेंडा उंचावत आपली दिशा स्पष्ट केली होती. हनुमान चालिसा प्रकरणानंतर देशभरात मिळालेल्या प्रसिद्धीचा लाभ मिळवण्याचे त्यांनी प्रयत्न केले. यामुळे संवेदनशील भागात हिंदू मतांचे ध्रुवीकरण कितपत झाले, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा, त्याआधीच भाजपमध्ये प्रवेश आणि उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी लावलेली हजेरी यातून वातावरण निर्मिती करण्याचा नवनीत राणा यांचा प्रयत्न होता. पण, स्थानिक भाजप नेत्यांचा छुपा विरोध ही राणा यांच्यासाठी अडचण ठरली. मतदान केंद्रांबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांची अल्प उपस्थितीची चर्चा रंगली. मात्र, महिलांमध्ये त्यांची असलेली चांगली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरला, हे मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे राबवलेला प्रचार, काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर आणि इतर सर्व नेत्यांनी वानखेडे यांच्यासाठी घेतलेली मेहनत सार्थकी लागणार का, याची उत्सुकता आहे.

गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना सहा विधानसभा मतदारसंघांपैकी अमरावती, मेळघाट, दर्यापूर आणि तिवसा या चार मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते. बडनेरा आणि अचलपूरमध्ये मात्र त्या मागे होत्या.

महायुतीचे घटक असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपस्थितीमुळे ही निवडणूक रंजक वळणावर पोहोचली. मुस्लीम, दलित आणि कुणबी मते निर्णायक ठरत असताना या मतांची विभागणी कशा पद्धतीने झाली, याचे आडाखे अजूनही बांधले जात आहेत.

यवतमाळ-वाशिम: उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूती

नितीन पखाले

यवतमाळ : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात ६२.८७ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ६१.३१ टक्के मतदान झाले होते. शिवाय महिलांचे मतदान वाढले. हे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ग्रामीण भागात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. वंचित बहुजन आघाडी, बसपा यांचे उमेदवार रिंगणात असले तरी त्यांनाही या वेळी महाविकास आघाडीची मते निर्णायक पद्धतीने ओढता आली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूती होती. त्याचा फायदा या मतदारसंघातील ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना होईल, अशी स्थिती होती. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री हेमंत पाटील या उमेदवार होत्या. राजश्री पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आल्याने त्यांना संपूर्ण मतदासंघांत निवडणूक प्रचार काळात पोहोचता आले नाही. उच्चशिक्षित व महिला उमेदवार म्हणून महिला आणि युवावर्ग त्यांच्याकडे वळला. भाजप, शिवसेनेची संघटनात्मक ताकदही पाटील यांच्या पाठीशी होती. राळेगावसारख्या आदिवासीबहुल विधानसभा मतदासंघात सर्वाधिक ६८.९६ टक्के मतदान झाले. या वेळी निवडणुकीत जातीय समीकरणांचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे मराठा, तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील या तिरळे कुणबी समाजाच्या आहेत. मतदारसंघात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असून त्यांची मतदारसंख्या निर्णायक आहे. तिरळे कुणबी समाजाचे साडेचार लाखांवर मते मतदासंघात आहे. मतदारसंघात निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष दिसला तरी, हिंदुत्व, राम मंदिर, नव मतदारांमध्ये मोदी- योगींची लोकप्रियता हे मुद्दे निवडणुकीत महायुतीसाठी पोषक ठरले.

नागपूर: जातप्रमाणपत्राचा मुद्दा निवडणुकीत प्रभावी?

राजेश्वर ठाकरे

शिवसेनेच्या (शिंदे) खासदाराला उमेदवारी नाकारून भाजपने त्यांना हवा तो उमेदवार शिवसेनेकडून निवडणुकीत उतरवल्याने शिवसैनिकांची नाराजी आणि काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे ऐनवेळी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा मुद्दा रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत प्रभावी ठरल्याचे दिसून आले. शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचितने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार किशोर गजभिये अशी तिरंगी लढत या मतदारसंघात झाली. येथे शिवसेना निवडणूक लढवत असली तरी उमेदवार भाजपपुरस्कृत असल्याने भाजपने र्पू्ण ताकद लावली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा या मतदारसंघात घेण्यात आली. त्याचा प्रभाव किती आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काँग्रेसने सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. मात्र, त्यांचे जातप्रमाणपत्र जात पडताळणी समितीच्या तपासणीत रद्द ठरल्याने रश्मी यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. रश्मी बर्वे यांच्याबद्दलची सहानुभूती या मतदारसंघात एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल, असे सांगतात. ही सहानुभूती मतदानात किती परावर्तित झाली यावरच काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात कामठी, हिंगणा आणि रामटेक हे महायुतीकडे तर सावनेर, काटोल आणि उमरेड हे विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. सर्वाधिक मतदान उमरेड विधानसभा मतदारसंघात (६७.१६ टक्के) झाले. येथून २०१९ मध्ये काँग्रेसकडून राजू पारवे विधानसभेत गेले होते. त्यामुळे हे वाढीव मतदानही लक्षवेधक ठरू शकेल.