सांगली : स्वातंत्र्य काळात जहाल पक्षाचे नेते असलेले लोकमान्य टिळक यांनी नेहमीच देशहित सर्वोतोपरी मानले. शरीर, मन आणि बुद्धी त्यांनी देशसेवेकरिताच खर्च केली. यामुळे ते देशाचे अमर आदर्श आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी सांगलीत केले.

सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ डॉ. भागवत यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा मनिषा काळे, माधव बापट, प्रकाश बिरजे, माणिक जाधव, अमृता गोरे, विनायक काळे, श्रीहरि दाते, प्रकाश आपटे होते. प्रारंभी लोकमान्य टिळकांना अभिवादन व संस्थेच्या स्मृतीचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

sangli lok sabha marathi news
सांगलीतील घोळावरून काँग्रेसचा रोख जयंत पाटील यांच्यावर ?
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?

हेही वाचा – प्रेयसीला मारहाण प्रकरणी एसआयटी स्थापन, चौफेर टीकेनंतर ठाणे पोलिस आयुक्तांचा निर्णय

हेही वाचा – छगन भुजबळ म्हणतात, “मनोज जरांगेंच्या नादी लागणार नाही, मात्र टीका केली तर…”

डॉ. भागवत म्हणाले, कोणत्याही व्यक्तीला जे महत्त्व प्राप्त होते ते त्याला मिळालेल्या स्थानामुळे असते. संघ स्वयंसेवकाच्या साध्या वर्तवणुकीचे अनेकांना नवल वाटते. परंतु संघाच्या कार्यपद्धतीतच याची शिकवण असते. सध्या शाखा, प्रशिक्षण वर्गातून स्वयंसेवकांची जडणघडण केली जाते. परंतु ज्या डॉ. हेडगेवारांनी संघ स्थापन केला त्यांनी कोठून शिक्षण घेतले असेल ? असा प्रश्न मनात येतो. आपले ध्येय निश्चित करुन त्ते साध्य करण्यासाठी वाटचाल करणे आवश्यक आहे. लो. टिळक यांनी आत्मियतेचे सूत्र जोपासले होते. त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यास आपल्याला याचा प्रत्यय येतो. लोकमान्यांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक राहतील. लोकमान्यांचे विचार चिरंतन राहण्यासाठी उपक्रम करीत असताना त्यामध्ये सातत्य हवे, केवळ सवय म्हणून नको तर प्रेरणादायी विचार मिळायला हवेत असेही त्यांनी सांगितले.