विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. एकीकडे विधानसभेत भास्कर जाधव यांनी केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल तसंच विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन गदारोळ माजला असताना दुसरीकडे विधानपरिषदेतही विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याता प्रयत्न केला. दरम्यान यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित राहिले असता चिडले आणि तुम्ही खाली बसा, तुम्ही काय मंत्री आहे का? असं म्हणत सत्ताधारी पक्षातील आमदाराला सुनावलं.

नेमकं काय झालं –

मंत्री महोदय गुळगुळीत उत्तर देत आहेत असं सांगत गोपीचंद पडळकर प्रश्न विचारण्यास उभे राहिले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या एका आमदाराला गोपीचंद पडळकरांनी झापलं आणि “तुम्ही खाली बसा, तुम्ही काय मंत्री आहे का? मी मंत्र्याशी बोलतोय…तुम्ही काय सांगता आम्हाला” असं म्हटलं. दरम्यान यावेळी अध्यक्षांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना रोखत पडळकरांना बोलण्यास सांगितलं.

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Raj Thackeray
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…

अहवालानंतरच आरोग्य भरतीच्या फेरपरीक्षेबाबत निर्णय -टोपे

मुलांच्या आयुष्याशी हे सरकार खेळत आहे अशी टीका करत ते म्हणाले की, “न्यासा कंपनीच्या दलालाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, चॅनेलकडून दाखवण्यात आली. तो दलाल स्पष्टपणे नोकरीची हमी देत होता, रेट कार्डही सांगितलं. त्याची चौकशी तुम्ही केली का? जर हे घडलं असेल तर त्या परीक्षेबाबतीत काय निर्णय घेणार आहात? एकट्या अमरावतीत २०० उमेदवारांनी दिल्याची माहिती मीडियाच्या माध्यमातून मिळत असून ती खरी आहे का?”.

राजेश टोपेंचं उत्तर –

“पडळकरांनी जे काही सांगितलं त्यात दलालांची ऑडिओ क्लिप म्हटलं असून त्यासंबंधी सायबर पोलीस तपास करत आहेत. काही तथ्य आढळलं तर ज्याला फाशीला द्यायचं असेल त्याला देऊ”. दरम्यान यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला असता ते म्हणाले की, “तुमच्या सगळ्यांचं समाधान कऱण्याची माझी तयारी आहे. सर्व पाळंमुळं खोदून काढू आणि ज्याच्याशी लिंक असेल, जो दोषी असेल त्याला शिक्षा देऊयात. ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जात आहे. आरोग्य विभागाने स्वत: एफआयआर केला आहे. हेतू चुकीचा असता तर आम्ही एफआयआर केलाच नसता”.

आरोग्य सेवेतील वर्ग तीन व चारच्या भरती परीक्षेतील गैरप्रकारांबाबत पोलीस चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावरच परीक्षांबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. वर्ग तीनच्या परीक्षेत गैरप्रकार झाले नसल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत केले. परीक्षा गैरप्रकारांबाबत निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशीची मागणी विरोधकांकडून करण्यात आल्यावर याप्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांकडून चौकशी करण्याची घोषणा टोपे यांनी केली.